Nashik Lok Sabha Election : अबब! ठाकरेंनी उमेदवारी नाकारलेल्या करंजकरांकडे 'कोट्यवधींची माया..'

Nashik Political News : विजय करंजकर यांच्याकडे फॉर्च्यूनर, जीप, ट्रॅक्टर, फियाट या वाहनांसह बुलेट मोटरसायकल आणि एक स्कूटर आहे. त्यांनी दोन बँकांकडून 16.32 लाखांचे कर्ज घेतले आहे.
Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha ElectionSarkarnama

Shivsena UBT News : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना ठाकरे गटाची उमेदवारी शेवटच्या क्षणी नाकारण्यात आली. यामुळे आता करंजकर पक्षापासून अंतर ठेवून आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आता व्यक्त होत आहेत.

महाविकास आघाडी करून नाशिक मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडण्यात आला. या मतदारसंघात ठाकरे गटाने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली. वाजे यांनी आपली आर्थिक क्षमता नसल्याचे कारण देत उमेदवारी नाकारली होती. मात्र पक्षाने आग्रह करून त्यांना उमेदवारी दिली. सध्या मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते आणि मतदार स्वतः पैसे जमा करून शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करीत आहेत. या सर्व घडामोडींत शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी नाकारलेल्या करंजकर यांच्याकडे चक्क 28 कोटींहून अधिक संपत्ती आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार आणि उमेदवारी नाकारलेले दोन्हीही चर्चेचा विषय ठरले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विजय करंजकर यांनी शुक्रवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरण असलेले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञा पत्रानुसार करंजकर यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये सात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. त्यांना अद्याप एकही प्रकरणात शिक्षा झालेली नाही.

Nashik Lok Sabha Election
Nashik Loksabha : नाशिकात ठाकरे गटाला धक्का! विजय करंजकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

करंजकर यांचे बारा बँकांमध्ये खाते आहेत. या खात्यांमध्ये 24.67 लाख रुपये जमा आहेत. त्यांच्याकडे 12.56 लाख तर पत्नी अनिता करंजकर यांच्याकडे 27.38 लाख रुपये कॅश इन हॅन्ड आहेत. विविध सहकारी बँकांचे 86100 रुपयांचे शेअर्स त्यांच्याकडे आहेत. करंजकर यांची मॅक्स लाइफ कंपनीची एक विमा पॉलिसी आहे. त्यांच्या पत्नी करंजकर यांच्याकडे तीन विमा पॉलिसी आहेत. त्याचे एकत्रित मूल्य 6.62 लाख आहेत. करंजकर यांनी आपल्या पत्नीकडून दोन लाख रुपये आणि योगेश हरक यांच्याकडून 9.50 लाख रुपये उसणे घेतले आहेत. (Lok Sabha Election 2024)

Nashik Lok Sabha Election
Latest Nashik News : मल्लिकार्जुन खर्गे, पवार आणणार बच्छाव यांच्या प्रचारात रंगत!
Nashik Lok Sabha Election
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

करंजकर यांच्या भगूर शहरात दहा शेतजमिनी आहेत. या शिवाय बांधिव आणि अन्य निवासी मालमत्ता आहेत. त्याचे मूल्य सुमारे 24 कोटी आहे. करंजकर यांच्याकडे 2430 आणि पत्नी अनिता यांच्याकडे 1500 ग्रॅम असे पावणेतीन कोटी रुपयांचे सोने आहे. या सर्व चल संपत्तीचे मूल्य 3.92 कोटी आहे. त्यांच्याकडे फॉर्च्यूनर, जीप, ट्रॅक्टर, फियाट या वाहनांसह बुलेट मोटरसायकल आणि एक स्कूटर आहे. त्यांनी दोन बँकांकडून 16.32 लाखांचे कर्ज घेतले आहे. (Shivsena)

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com