Himgauri Adke Aher : ...तर थेट निलंबन! नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांचा नगरसेवकांना कडक इशारा, पालिकेचा कारभार सुधरणार?

Nashik Mayor issues strict warning to councillors : नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी नगरसेवकांना कडक इशारा दिला असून पालिकेच्या कामकाजात अडथळा आणणाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
Himgauri Adke Aher warns Nashik councillors
Himgauri Adke Aher warns Nashik councillorsSarkarnama
Published on
Updated on

Himgauri Adke Aher latest political update: नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी मंगळवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. गैरवर्तन करणाऱ्या नगरसेवकांचा उपद्रव नियंत्रणात आणण्यासाठी ते महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र विविध राजकीय गटांत आणि सोयीने वागणाऱ्या नगरसेवकांवर त्याची अंमलबजावणी होईल का?

महापौर आडके-आहेर यांच्या उपस्थितीत मंगळवारी महासभा झाली. सिडको प्रभाग समितीत भाजप नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि अपक्ष मुकेश शहाणे यांच्यातील गैरवर्तनाची पार्श्वभूमी या महासभेला होती. त्यामुळे त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक होते.

Himgauri Adke Aher warns Nashik councillors
BJP Politics : 60 कोटींच्या 'बोगस' प्रकरणामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर! भाजपने काढला नगरसेवकांसाठी नवा 'फतवा', हायकमांड ॲक्शन मोडमध्ये!

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उपमहापौर विलास शिंदे, गटनेते अजय बोरस्ते, बंटी तिदमे, भाजपचे दिनकर पाटील यांनी महापौरांना याविषयी पत्र दिले होते. या पत्रात संबंधित नगरसेवकांच्या घरवर त्यांना विषयी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या घटनेने महापालिकेच्या प्रतिष्ठेला आणि शहराच्या प्रतिमेला काळीमा फासल्याचा आक्षेप त्यांनी घेतला होता.

स्वाभाविकपणे त्यावर चर्चा झाली. यावेळी उपमहापौर तसेच शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांनी सिडको प्रभाग समितीत झालेल्या वर्तनावर तीव्र आक्षेप घेतला. संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या नेत्यांनी केली. लगोलग त्याची दखल महापौरांनी घेतली.

महापौर आडके- आहेर या उच्चशिक्षित आहेत. त्याचे प्रतिबिंब त्यांनी घेतलेल्या निर्णयात दिसले. अशा प्रकारचे वर्तन आणि असभ्य भाषेचा वापर करण्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे अशा घटना घडल्यास महासभा स्वतःहून त्याची दखल घेईल. असे वर्तन करणाऱ्या नगरसेवकांना सहा महिन्यांसाठी महासभेतून निलंबित करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.

वस्तूता बहुतांशी सभांमध्ये नगरसेवक विषय चर्चेला घेतात, त्यामागे एक हेतू असतो. ठराविक नगरसेवक असे विषय घेऊन त्यावर वाद घालत असतात. यामध्ये नगरसेवकांचा एक कंपू तयार झालेला नाशिक महापालिकेत पाहायला मिळालेला आहे. असाच अनुभव अन्य महापालिका देखील असू शकतो. त्यामुळे भाजपचे दिनकर पाटील वगळता अन्य नेत्यांनी हा विषय उपस्थित केला नाही. हे अतिशय बोलके आहे.

Himgauri Adke Aher warns Nashik councillors
Sachin Ahir Video : सचिन अहिरांसाठी 'ती' तांत्रिक अडचण बनली ताकद! उद्धव ठाकरेही हतबल!

महापौरांनी सिडको प्रभाग समितीत घडलेल्या प्रसंगाचा संदर्भ घेत संबंधितांवर कारवाईचे धाडस दाखविले असते, तर त्याचा एक वेगळा प्रभाव निर्माण झाला असता. मात्र संबंधितांना अभय देऊन भविष्यात कारवाईचे सुतोवाच करणे हा देखील राजकारणाचा भाग असू शकतो.

सिडको प्रभाग समितीत परस्परांचा उद्धार करणारे दोन्ही नगरसेवक ज्येष्ठ आहेत. एक नगरसेवक तर भाजपचा असून त्याचे महापालिका प्रशासन आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर चांगलाच प्रभाव आहे. त्यामुळेच निलंबनाचा निर्णय भविष्यात होईल, हा महापौरांचा दावा देखील त्यामुळेच राजकीय तर नाही ना, ही चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com