BJP Politics : 60 कोटींच्या 'बोगस' प्रकरणामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर! भाजपने काढला नगरसेवकांसाठी नवा 'फतवा', हायकमांड ॲक्शन मोडमध्ये!

PCMC BJP Corporators : पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांविरोधात भाजपचे वरिष्ठ नेते आक्रमक झाले आहेत. पक्षशिस्त न पाळणाऱ्यांविरोधात थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
Internal conflict erupts in BJP over fake case allegations
Internal conflict erupts in BJP over fake case allegationsSarkarnama
Published on
Updated on

BJP high command takes action on party controversy: पिंपरी चिंचवड महापालिकेतील अवघ्या पाच महिन्यांच्या सत्ताकाळात विविध वादग्रस्त विषयांवर सत्ताधारी भाजपला माघार घेण्याची नामुष्की ओढवल्यानंतर, आता स्वपक्षातील बंडखोर आणि नाराज नगरसेवकांना वेसण घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजप कोअर कमिटीने एक अत्यंत कडक पाऊल उचलले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता आली आहे. मात्र, या दुसऱ्या टर्ममध्ये सत्ता आल्यापासूनच महापालिकेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष आणि समन्वयाचा प्रचंड अभाव असल्याचे वारंवार समोर आले आहे. सत्ता येऊन अवघे पाच महिने पूर्ण झाले असताना, सभागृहात एखादा महत्त्वाचा विषय मंजूर करण्यासाठी पक्षाचा स्पष्ट 'व्हिप' जारी केलेला असतानाही अनेक नगरसेवकांनी उघडपणे विरोधाची भूमिका घेत आहेत.

विशेषतः महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक विषयांवर नगरसेवकांनी पक्षविरोधी भूमिका मांडली आहे. त्यातच ६० कोटी रुपयांच्या बोगस उपसूचना प्रकरणावरून पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत विसंवाद आणि वाद चव्हाट्यावर आला होता.

या चुकीच्या कारभारामुळे आणि वाढत्या विरोधामुळे अखेर महापौर रवी लांडगे यांच्यावर जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली होती. या सर्व घडामोडींमुळे पक्षातील अंतर्गत दुफळी आणि गटबाजी चव्हाट्यावर आल्याने पक्षश्रेष्ठींनी याची गंभीर दखल घेतली आणि कोअर कमिटीची तातडीची बैठक घेऊन निर्णय घेतला आहे.

Internal conflict erupts in BJP over fake case allegations
BJP President Politics : भाजपमध्ये खळबळ! प्रदेशाध्यक्षांनाच पदावरून हटविण्याची मागणी? व्हायरल ऑडिओमुळे कर्नाटकमध्ये राजकीय वाद

महापालिकेतील पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावांना आणि निर्णयांना स्वपक्षातीलच नगरसेवकांनी जाहीरपणे विरोध दर्शवल्याने पक्षाची मोठी नाचक्की झाली होती. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीने नगरसेवकांसाठी एक प्रकारे नवा 'नियम'च काढला आहे.

"पक्षाच्या किंवा प्रशासनाच्या बाबींवर नगरसेवकांनी जाहीरपणे कुठेही बोलायचे नाही. त्यांना काही आक्षेप असल्यास त्यांनी पक्षांतर्गत फक्त सूचना कराव्यात. जर कोणीही जाहीर भूमिका घेतली किंवा पक्षाविरोधात भाष्य केले, तर संबंधित नगरसेवकांवर थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाईल," असा इशारा देण्यात आला आहे.

नगरसेवकांना मिळणार 'प्रबोधन'चे धडे

पिंपरी-चिंचवड महापालिकेत यंदा तब्बल ६४ नगरसेवक हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. पहिल्यांदाच सभागृहात पाऊल ठेवल्यामुळे या नवीन नगरसेवकांना महापालिका सभागृहाच्या कामकाजाचा, सभाशास्त्राचा आणि प्रशासकीय नियमांचा कोणताही पूर्वानुभव किंवा गंध नाही.

यासाठी मुंबई येथील प्रसिद्ध 'रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी'मध्ये येत्या १०, ११ आणि १२ जुलै रोजी सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी त्रिसदस्यीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Internal conflict erupts in BJP over fake case allegations
Uddhav Thackeray Setback : पुण्यात शिवसेना आणखी खिळखिळी? पाच संपर्कप्रमुखांनी सोडली ठाकरेंची साथ; चार एकनाथ शिंदेंच्या गोटात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com