Sachin Ahir Video : सचिन अहिरांसाठी 'ती' तांत्रिक अडचण बनली ताकद! उद्धव ठाकरेही हतबल!

Sachin Ahir Denies Leaving Shiv Sena : उद्धव ठाकरेंची साथ सोडत उपसभापती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सचिन अहिर यांच्या दाव्याने नवा पेच निर्माण झाला आहे. आपण पक्ष सोडला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Sachin Ahir video creates political buzz in Maharashtra
Sachin Ahir video creates political buzz in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Sachin Ahir and Uddhav Thackeray latest controversy: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटले. या फुटीनंतर मैदानात उतरलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला. त्यांच्या पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदेंची साथ देत उपसभापतीपदासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

सचिन अहिर यांनी शिंदेंची साथ दिल्याने वरळी मतदारसंघातील समीकरणे बदलणार असल्याची चर्चा होती. त्यातच एकट्या सचिन अहिर यांनी पक्षांतर केल्याने त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी ठाकरेंची शिवसेनेकडून पावले उचललेली आहेत. दरम्यान, सचिन अहिर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा ट्विस्ट आला आहे. ते म्हणाले, 'लक्षात घ्या मी पक्ष सोडलेला नाही. तांत्रिक मुद्यावर आपण नंतर वेगळ्या व्यासपीठावर बोलू.'

'एक गोष्ट नक्की आहे की शिंदेसाहेबांनी उपसभापतीपदाची जबाबदारी माझ्या सारख्या कार्यकर्त्याकडे देणे हा बहुमान आहे. या पदाचा मान ठेवून मी भविष्यात काम करणार आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.

Sachin Ahir video creates political buzz in Maharashtra
Sachin Ahir Politics: एकनाथ शिंदेंचा 'फूलप्रूफ' प्लॅन फसणार, सचिन अहिर यांची आमदारकी जाणार? ठाकरे पुढच्या 24 तासांतच मोठा निर्णय घेणार

कारवाईला तांत्रिक अडचण...

अहिर यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्यास मोठी अडचण आहे. ते 2022 मध्ये धनुष्यबाण चिन्हावर विजयी झाले होते. मात्र, आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आहे. त्यामुळे ते मूळ शिवसेनेत असल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाई करण्यात तांत्रिक अडचण येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Sachin Ahir video creates political buzz in Maharashtra
Abdul Sattar : ठाकरेंचे सहा खासदार फोडण्यातही अहिरांचा महत्वाचा रोल : अब्दुल सत्तारांचा खळबळजनक दावा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com