MLC Election : नाशिक विधानपरिषदेसाठी महायुती एकच उमेदवार देणार की भाजप-शिवसेना लढत होणार? या आहेत 4 शक्यता

Nashik MLC Election : नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे प्रचंड बहुमत आहे. परंतु उमेदवारीचा पेच निर्माण होऊ शकतो अशी सध्याची स्थिती आहे. नेमकं काय होतं याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
eknath shinde Devendra Fadnavis
eknath shinde Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेची निवडणूक घोषित झाली आहे. १८ जूनला मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकुण ६२२ मतदार असून ९ केंद्रावर १८ जुनला मतदान होणार आहे.

महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे, परंतु महायुतीकडून उमेदवार कोण राहील, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे निवडणूक महायुती म्हणून लढवली जाईल का हा मोठा प्रश्न आहे. कारण भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी तीन्ही पक्षांमध्ये इच्छुक उमेदवार असून आपली दावेदारी दाखवत आहेत. नाशिकमध्ये महायुतीमध्ये काय होऊ शकतं याच्या पुढील ४ शक्यता आहेत.

१. भाजप विरोधात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र

नाशिक महापालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेना व राष्ट्रवादीची युती झाली होती. भाजप विरोधात दोन्ही पक्ष एकत्र आले होते. तेच चित्र विधानपरिषदेत देखील दिसू शकतं. समजा, विधान परिषदेसाठी भाजपने स्वबळावर लढण्याचे ठरवले आणि भाजपच्या विरोधात शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आले, तर सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार त्यांचे एकत्रित संख्याबळ २७८ होते. ही संख्या भाजपच्या १९० पेक्षा मोठी असल्याने अशा परिस्थितीत शिवसेना व राष्ट्रवादीला विजयाची संधी निर्माण होऊ शकते.

२. शिवसेनेला सोडून भाजप-राष्ट्रवादी एकत्र

दरम्यान नाशिकच्या जागेवर शिवसेनेचे नरेंद्र दराडे इच्छुक आहेत. मागच्यावेळी तेच आमदार होते. अशा स्थितीत जर शिवसेनेने ऐकले नाही तर भाजप राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेविरोधात निवडणूक लढू शकते. कारण शिवसेनेपेक्षा भाजपकडे जागा जास्त असल्याने भाजप ही जागा सोडण्याची शक्यता कमी आहे असे काही राजकीय जाणकार सांगतात. भाजप-राष्ट्रवादी समीकरण जुळल्यास हे समीकरण देखील पक्षीय बलानुसार शिवसेनेला मात देऊ शकतं. उपलब्ध आकडेवारीनुसार भाजपचे १९० व राष्ट्रवादीचे १०७ असे मिळून २९७ होतात जे बहुमताच्या अगदी जवळ जाते. राष्ट्रवादीच्या मदतीने भाजप महाविकास आघाडीतील सदस्य अथवा अपक्षांच्या मदतीने बहुमताचा आकडा पूर्ण गाठू शकते.

eknath shinde Devendra Fadnavis
MLC Election : नाशिक विधानपरिषदेत महायुतीला कडवी टक्कर देण्यासाठी 'मविआ'ची तयारी ; इस्लाम, समाजवादी पार्टीला सोबत घेण्याच्या हालचाली

३. भाजप महाविकास आघाडीतील सदस्य तसेच अपक्षांना आपल्याकडे वळवू शकतं.

तिसरी शक्यता अशी की, जर महापालिकेत झाले तसे भाजप विरोधात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आली तर अशा परिस्थितीत भाजप स्वबळावरु लढून महाविकास आघाडीतील सदस्य तसेच अपक्षांना आपल्याकडे वळवू शकतं. परंतु अशा परिस्थितीत भाजपला विजय मिळवण्यासाठी अधिक ताकद लावावी लागेल. गणित जुळवून आणणे थोडे अवघड होऊ शकते.

eknath shinde Devendra Fadnavis
MLC Election : भाजपने शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ पोखरला : आणखी एक आमदार वाढणार; गोरंट्याल की केनेकर, कोणाला मिळणार संधी?

४. तर राष्ट्रवादी भाजप व शिवसेनेला सोडून निवडणूक लढेल

समजा, महायुतीत जागा शिवसेनेला सुटली आणि येवल्यातून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळाली, तर मंत्री छगन भुजबळ व दराडे यांचे जुने राजकीय वैमनस्य पुन्हा समोर येऊ शकते. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल.

अशा स्थितीत राष्ट्रवादी भाजप व शिवसेना वगळून महाविकास आघाडीसह एमआयएम, इस्लाम पक्ष आणि अपक्षांची मोट बांधू शकतं. जर राष्ट्रवादी काँग्रेस यात यशस्वी झाला, तर त्यांनाही विजय खेचून आणणे अशक्य नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

एकूणच, नाशिक विधान परिषदेच्या या निवडणुकीत महायुतीकडे प्रचंड बहुमत असले तरी उमेदवारीचा पेच, अंतर्गत नाराजी आणि अपक्ष-छोट्या पक्षांची जुळवाजुळव यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतरच खरी लढत कोणामध्ये होणार आणि कोणाचे पारडे जड राहणार, हे स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com