MLC Election : नाशिकचे सगळे नगरसेवक भिंवडीतील त्या रिसॉर्टवर एकत्रित आणले जाणार; CM फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री करणार मार्गदर्शन

Nashik MLC Election : नाशिक विधान परिषद निवडणुकीत रिसॉर्ट पॉलिटिक्स रंगात आहे. दगाफटका होऊ नये म्हणून सर्व मतदार नगरसेवकांना एका रिसॉर्टमध्ये एकत्रित आणून त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे.
Narendra Darade
Narendra DaradeSarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election : नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष गोकुळ गिते व प्रसाद हिरे यांनी प्रचार थांबवला आहे. मात्र, रिंगणात महायुतीचे नरेंद्र दराडे हे एकच उमेदवार असताना व विजयासाठी आवश्‍यक बहुमत हाती असतानाही महायुतीला रिसॉर्ट पॉलिटिक्सचा अवलंब करावा लागला आहे.

13 जूनला शिवसेनेच्या नगरसेवकांना नाशिकमधून ठाण्याकडे हलवण्यात आलं. या सर्व मतदार नगरसेवकांना भिवंडी येथील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा हे नगरसेवक रिसॉर्टवर पोहचले होते. शिवसेना नेते तथा खासदार नरेश मस्के आणि ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झालेले रविंद्र फाटक यांनी त्यांची भेट घेत स्वागत केलं.

महायुतीमधील भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदार दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. १४) रवाना होणार होते. परंतु, त्यांचे जाणे काही कारणांनी लांबणीवर पडले. परंतु आज सोमवार (दि. १५) भाजपचे नगरसेवक रवाना होणार आहेत. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक आज किंवा उद्या जाऊ शकतात असे कळत आहे.

Narendra Darade
Nashik MLC Election : दराडेंना अजूनही गोकुळ गितेंवर भरोसा नाय, महायुतीच्या सगळ्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्याचा निर्णय

या सर्व मतदारांना रिसॉर्टवर एकत्रित आणण्यात येणार असून, त्यांची बुधवारी (दि. १७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्याबरोबर बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री मतदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती महायुतीकडून देण्यात आली आहे.

मतपत्रिकेवर तिघांची नावे

विधान परिषद निवडणुकीत तांत्रिकदृष्ट्या मतपत्रिकेवर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासह अपक्ष गोकुळ गिते व प्रसाद हिरे दोघांची नावे असणार आहेत. पण, प्रसाद हिरे यांनी माघार घेतल्याने व गोकुळ गिते यांनी प्रचार थांबवल्याचे जाहीर केल्याने निवडणुकीत केवळ औपचारिकता शिल्लक आहे. मात्र, तरीही महायुती कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाही. दगाफटका टाळण्यासाठी महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांच्या मतदारांना रिसॉर्टची सफर घडविण्यात येत आहे.

Narendra Darade
MLC Election : नाशिकमध्ये महायुतीचा एकच उमेदवार तरी कसली भीती? ठाण्यातील आलिशान हॉटेलमध्ये नगरसेवकांसाठी 'अभ्यास वर्ग' आणि मंत्र्यांचे सत्र

भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार रविवारीच रवाना होणार होते. मात्र, काही कारणास्तव ते नाशिकमध्ये थांबून आहेत. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षाच्या मतदारांच्या गाठीभेटी घेत चर्चा केली. उमेदवार प्रत्येक मतदाराची वैयक्तिक भेट घेत असून त्यामुळेच भाजप नगसेवकांनी सहलीचा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलल्याची चर्चा आहे.

महायुतीने विधान परिषद निवडणूकीत बंडखोरांचे बंड शमवले आहे. मात्र, तरीही सावधगिरी म्हणून मतदारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. शिवसेनेचे सुमारे १०० मतदार हे पहिल्या टप्प्यात ठाण्यात पोहोचले. पक्षाचे उर्वरित ७१ मतदार हे मित्रपक्ष भाजप व राष्ट्रवादी सोबत कूच करणार होते. परंतु, भाजप व राष्ट्रवादीचे मतदार हे दिवसभर एकत्रित येऊ शकले नाहीत. आज भाजपचे नगरसेवक रवाना होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com