Nashik MLC : गोकुळ गीतेंचा बॉल आता थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; फडणवीसांना शिवसेनेचे साकडे?

Gokul Gite Rebellion : शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यावर बंडखोरांच्या माघारीची जबाबदारी टाकण्यात आली होती. त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही. त्यामुळे मैदानात उतरलेल्या गोकुळ गीते यांच्याबाबत काय करावे हा प्रश्न कायम आहे.
Narendra Darade, Gokul Gite
Nashik MLC Election | Gokul Gite | Narendra DaradeSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 10 Jun : नाशिक विधानपरिषदेची निवडणूक प्रचारापेक्षा वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार नरेंद्र दराडे अद्यापही प्रचाराऐवजी भाजप नेत्यांच्या संपर्कासाठी अधिक वेळ देत आहेत.

शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यावर बंडखोरांच्या माघारीची जबाबदारी टाकण्यात आली होती. त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही. त्यामुळे मैदानात उतरलेल्या गोकुळ गीते यांच्याबाबत काय करावे हा प्रश्न कायम आहे.

भाजप नेते गिरीश महाजन, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गोकुळ गीते यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे याबाबत मंगळवारी निर्णय होईल अशी घोषणा करण्यात आली होती.

Narendra Darade, Gokul Gite
Balbharati Textbook Controversy : ‘बालभारती’तून महाराष्ट्राची लोकनृत्ये गायब; फक्त ‘दिंडी’चा उल्लेख, इतर राज्यांच्या नृत्यांना रंगीत चित्रांमध्ये स्थान

प्रत्यक्षात मात्र मंगळवारी कोणतीही घोषणा होऊ शकली नाही. या उलट बंडखोर गोकुळ गीते यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार किशोर दराडे यांनी पडद्याआड 'ऑफर' दिल्याचे चर्चेत आहे. या ऑफरमुळे निवडणूक वेगळ्याच स्तरावर घेण्याचे उमेदवाराच्या निकटवर्ती यांनी सांगितले.

गोकुळ गीते यांनी माघार घ्यावे यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करीत असल्याच्या चर्चा होत्या. काल सायंकाळी गीते यांना मुंबईला मुख्यमंत्र्यांनी पाचारण केल्याची बातमी पसरली होती. प्रत्यक्षात मात्र तसे काहीही घडले नाही. नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निवडून येणार हे नक्की आहे.

Narendra Darade, Gokul Gite
Meenakshi Natarajan : ना FIR, ना पोलीस तपास, ना शिक्षा..., तरीही काँग्रेसच्या मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद कसा झाला? लपवलेलं प्रकरण नेमकं काय आहे?

मात्र त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची कोंडी करण्यात भाजप यशस्वी झाला हे नक्की. निवडणूक निकालापूर्वीच महायुतीचे अधिकृत उमेदवार दराडे यांना बंडखोरांनी त्रस्त केलं आहे. गोकुळ गीते यांनी गांभीर्याने निवडणुकीला सुरुवात केली आहे.

आता शेवटचा आठवडा निर्णायक ठरणार आहे. यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याची संधी विरोधक घेण्याची शक्यता आहे. या चिंतेने उमेदवार दराडे कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर आता माघारीच्या चर्चा मागे पडतात की आज नव्या चर्चांना उधान येते याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com