Nashik MLC Election : भाजपने शोध लावलाच! विधान परिषदेला 45 टक्के मतांची फाटाफूट अन् दराडेंचा गेम; चौकशी अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे रवाना

Nashik MLC Election Report Highlights 45% BJP Vote Split : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अपक्ष गोकुळ गिते यांनी पराभव केला.
Nashik MLC Election
Nashik MLC ElectionSarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक राज्यात प्रचंड गाजली. या निवडणुकीत महायुतीची अधिकृत उमेदवारी शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना मिळाली होती. मात्र, निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी त्यांचा पराभव केला. तब्बल १०९ मतांच्या फरकाने गितेंनी दराडेंना पराभवाची धूळ चारली. गोकुळ गिते यांना ३५७ मते मिळाली तर नरेंद्र दराडे यांचा रथ २४८ वर थांबला. या निवडणुकीत महायुतीची तब्बल २१८ मते फुटली.

या निवडणुकीत भाजपची देखील मते फुटल्याचे वृत्त असून, पक्षाच्या कथित चौकशी अहवालात त्याबाबतचा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. निवडणुकीत मतांचा घोडेबाजार झाला आणि त्यामुळे मते अपक्ष उमेदवार गोकुळ गितेंना गेल्याचा प्राथमिक अहवाल देखील तयार करण्यात आल्याची चर्चा आहे.

भाजपकडून फाटाफूटीची चौकशी करण्यात आली असून तसा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार भाजपच्या एकुण मतांपैकी ४५ टक्के मतांची फाटाफूट झाल्याचे निष्पन्न झाले असून कथित चौकशी अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे.

या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी प्रचंड दबाव टाकल्यानंतर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र, त्यांनी दराडे यांना जाहीर पाठिंबा दिला नव्हता. तांत्रिक कारणामुळे मतपत्रिकेवर त्यांचे नाव कायम होते. त्यामुळे गिते यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली, मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी छुपा प्रचार कायम ठेवला. ते रात्रीच्या अंधारात मतदारांपर्यंत पोहोचले. त्यांनी महायुतीच्या नेत्यांसह विरोधी उमेदवार दराडेंना त्याची भनकही लागू दिली नाही.

Nashik MLC Election
Nashik MLC Election : नाशिकच्या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी धनवर्षाव ; 70 ते 80 कोटींचा चुराडा झाल्याची चर्चा

गोकुळ गिते हे रिंगणात कायम राहिल्यास भाजपच्या मतांची विभागणी होईल असे बोलले जात होते. प्रत्यक्षात गिते रिंगणात कायम राहिल्याने तसेच झाले. भाजपच्या मतांची विभागणी झाली आणि त्याचा मोठा फटका नरेंद्र दराडे यांना बसला. पराभवानंतर नरेंद्र दराडे आणि त्यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांनी पराभवाचे खाबर भाजपवर फोडलं. महायुती फुटल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपाने गोपनीयरित्या मतफुटीची चौकशी आरंभली होती.

भाजपचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय चौधरी यांनी यासंदर्भात नाशिकला अचानक दौरा करून काही नगरसेवक आणि काही पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चौकशी केल्याचे समजते. अचानक मनपात भेट दिली. त्यानंतर विश्राम गृहावर देखील काही पदाधिकाऱ्यांना बोलवून चर्चा केली होती.

भाजपकडे एकुण १८८ मतदार होते. त्यापाठोपाठ शिवसेनेकडे १७१, तर राष्ट्रवादीकडे १०८ मते होती. चौकशीत भाजपचे यातील ४५ टक्के अर्थात जवळपास अंदाजे ८४ ते ८५ मते फुटल्याचे समोर आल्याची माहिती सूत्रांकडून कळते. परंतु मतदान गुप्त असतानाही भाजपने हा आकडा कसा काढला व कशी चौकशी केली हा मोठा सवाल आहे.

Nashik MLC Election
Nashik MLC Election : "तू नाराज होऊ नको..." गोकुळ गितेंचा शिवसेना प्रवेश अन् एकनाथ शिंदेंचा दराडेंना फोन, इनसाईड स्टोरी आली समोर

या चौकशी दरम्यान, काही नगरसेवकांच्या फोनवरील संभाषण हा मोठा पुरावा मानला गेल्याचे समजते. काही ऑडिओ आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने तेच चौकशीत महत्त्वाचे मानले गेल्याचे समजते, त्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान फुटीरांवर पक्षाकडून काय कारवाई होते तेही पाहावे लागणार आहे.

भाजपच्या या कथित अहवालानुसार पाहिले असता जर महायुतीच्या एकुण फुटीर २१८ मतांपैकी ८५ मते भाजपची असेल तर उर्वरित १३३ मते राष्ट्रवादी व शिवसेनेची फुटली असा अंदाज काढायला निश्चितच वाव आहे. त्यातही राष्ट्रवादीची किती व शिवसेनेची किती हा प्रश्न आहे.

चौकशी कुणाला टार्गेट करण्यासाठी?

महायुतीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेची देखील मते फुटली आहेत. मात्र, दोन्ही पक्षांकडून त्यासंदर्भात चुप्पी आहे. मात्र, भाजपकडून कोण फुटीर आहे हे खोदून काढले जात आहे. वास्तविक गोकुळ गिते आता शिवसेनेचे सहयोगी सदस्य झाल्याने शिवसेनेलाही नगाला नग मिळाला आहे. त्यामुळे शिवसेनेकडूनही फुटीची कुठलही चौकशी नाही. अशात गुप्त मतदान पद्धती असतानाही भाजपकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे हा कथित अहवाल भाजपमधील एका बड्या नेत्याला टार्गेट करण्यासाठी असल्याचं भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com