Nashik Politics : नाशिक विधान परिषदेच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. विशेषत: शिवसेना-भाजपत ओढाताण आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे नाशिकमधून विजयी झाले होते. त्यामुळे विजयी जागा सोडायची नाही या भूमिकेवर पक्ष ठाम असल्याचे स्थानिक नेत्यांकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
दुसरीकडे, भाजपकडून नाशिक मतदारसंघात पक्षाचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने या जागेवर दावा करण्यात येत आहे. शिवाय इच्छुकांची संख्या मोठी असल्याने नाशिकचा आग्रह सोडण्यास भाजपचे स्थानिक नेते तयार नसल्याचे चित्र आहे. भाजप नेते व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे स्वत: नाशिकची जागा भाजपकडेच खेचून आणतील असा विश्वास स्थानिक नेत्यांना असल्याने इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.
शिवसेनेने राज्यभरात सात जागांची मागणी केली असून, त्यात नाशिकच्या जागेला प्राधान्य दिले आहे. वरिष्ठ पातळीवरूनही नाशिकसाठी आग्रही भूमिका घेतली जात आहे. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेच्या अवघ्या दोन जागा आहे. शिवसेनेचे सुहास कांदे व दादा भुसे दोघे आमदार आहे. अशात जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवली पाहीजे या दृष्टीने तिसरी जागा टिकवल्यास जिल्ह्यात तीन आमदार होऊ शकतात, असे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या या प्रतिष्ठेच्या मतदारसंघावरून शिवसेना-भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही पक्ष मागे हटायला तयार नाही. त्यामुळे येथे मैत्रिपूर्ण लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून या जागेसाठी नरेंद्र दराडे, अंजुम कांदे, अजय बोरस्ते, भाऊसाहेब चौधरी, विजय करंजकर इच्छुक आहेत. तर भाजपमध्ये गणेश गिते, नीलेश बोरा यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपमध्ये आणखी इच्छुकांची संख्या वाढल्याचे वृत्त आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. त्यापूर्वी महायुतीच्या जागावाटपाची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. नाशिकची जागा शिवसेनेकडे गेल्यावर भाजपमध्ये बंडखोरी उसळू शकते. त्यातून महायुतीच्या एकजुटीला धक्का बसू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये होणाऱ्या बैठका आणि त्यातून होणाऱ्या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.