NMC News: ठाकरेंच्या शिवसेनेतील फूट टळली! स्वीकृत नगरसेवक नियुक्तीत पडद्यामागे काय शिजत होतं? काँग्रेसने भाजपला पुरवली रसद!

Nashik Municipal Corporation:नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरून भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेत राजकीय हालचालींना वेग आला होता. काँग्रेस नगरसेवक सुफी जीन यांचा अर्ज तांत्रिक कारणामुळे फेटाळण्यात आल्याने ठाकरे गटातील संभाव्य फूट टळली.
NMC Nashik.
NMC Nashik.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik News: नाशिक महापालिका स्वीकृत सदस्य नियुक्तीच्या प्रक्रियेतही भाजपला राजकीय फोडाफोडीचा मोह आवरता आला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फोडण्याचे प्रयत्न झाले. मात्र ऐनवेळी ते मागे पडले आहेत.

महापालिका स्वीकृत सदस्य नियुक्तीत प्रशासनाने भाजपचे सहा तर शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाला प्रत्येकी दोन असे दहा स्वीकृत सदस्य संख्याबळाच्या आधारे निश्चित झाले होते. त्यानुसार दहा अर्ज आल्याने त्यांची घोषणाही झाली. मात्र ऐनवेळी यामध्ये काँग्रेसचा एक अर्ज आल्याने राजकीय गोंधळ उडाला होता.

भाजपचे सुनील आडके यांच्या नावाची शिफारस चक्क काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन यांनी केली. त्यांचा हा अर्ज आयुक्तांकडे परस्पर सादर करण्यात आला. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस गटनेत्याची पडद्यामागचे छुपे राजकारण चर्चेत आले.

या संदर्भात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले होते. मात्र यातून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपच्या सदस्यांची शिफारस केल्याने काँग्रेसच्या प्रतिमेला धक्का बसला.

NMC Nashik.
OBC Students: सरकारचा मोठा निर्णय! ओबीसी, भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता वाढला; महिन्याला मिळणार इतके रुपये

महापालिकेत काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत. त्यांची नोंदणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सदस्यांसमवेत करण्यात आली आहे. गटनेते केशव पोरजे यांनी हेमंत दत्तात्रय गायकवाड आणि पत्रकार बाबा गायकवाड यांची शिफारस वरिष्ठांच्या सूचनेनुसार केली होती. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही गायकवाड स्वीकृत सदस्य झाल्यात जमा होते.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याशी काँग्रेस आणि शिवसेना गटने त्यांची यापूर्वी चर्चा झाली होती. काँग्रेसला त्यात सदस्य देता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेसच्या अतृप्त नगरसेवकांना हाताशी धरून ठाकरे गटात फूट पाडण्याचा भाजपने डाव आखला होता.

NMC Nashik.
लेक लाडकी योजनेचा लाभ कोणाला मिळणार? अर्ज करण्यापूर्वी या १० गोष्टी जाणून घ्या

गेले दोन आठवडे त्याची पडद्यामागे आणि उघडपणे चर्चा सुरू होती. शासनाने फक्त गटनेत्यांनाच अर्ज दिले होते. त्यामुळे स्वीकृतचा अर्ज काँग्रेसच्या नगरसेवकाला कसा मिळाला? हा गंभीर प्रश्न आहे. भाजपच्या गोटातूनच हा अर्ज पुरविण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या समितीने संबंधित अर्जाबाबत काय निर्णय घ्यावा यासाठी शुक्रवारी चर्चा केली.

NMC Nashik.
Shalarth Portal: शालार्थ आयडीच्या प्रलंबित प्रकरणांना मिळणार गती; शिक्षण विभागाचा मोठा प्रशासकीय बदल, मंजुरी आता कोणाकडे?

त्यात गटनेत्याचा आणि संबंधित उमेदवाराचा अर्ज थेट आयुक्तांकडे आल्या नसल्याने तांत्रिकदृष्ट्या तो फेटाळण्यात आला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचा जीव भांड्यात पडला आहे. भाजपकडून ठाकरे गटात फूट पाडण्याचे राजकारण त्यामुळे हा अयशस्वी झाले असे म्हणता येईल. असे असले तरी ठाकरे गटात फूट पाडण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन माध्यम बनले होते हे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.