Nashik NMC News: नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून सुरू झालेला राजकीय वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. भाजपसह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातही यावरून राजकारण तापले आहे. त्यामुळे इच्छुकांची घालमेल वाढली आहे. यातच काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन यांनी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपवर यावरुन गंभीर आरोप केले. न्यायालयाच्या निर्देशांनंतरही ही प्रक्रिया गुपचूप राबविली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
यासंदर्भात निवडणूक झाल्यावर सहा महिने ही प्रक्रिया रेंगाळली होती. सत्ताधारी भाजप आणि महायुतीच्या इच्छुकांची मोठी संख्या त्याला कारणीभूत होती. यासंदर्भात राजकीय दबाव वाढल्याने भाजपच्या महापौरांची चांगलीच कोंडी झाली होती.
काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तातडीने प्रक्रिया राबविण्याचा सूचना केल्या. त्यामुळे सत्ताधारी भाजपा आघाडीची चांगलीच कोंडी झाली आहे.
आता याबाबत नगरसेवक सुफी जीन यांनी महापालिकेच्या प्रशासनावर आणि सत्ताधारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. न्यायालयाच्या निकालानंतरही महापालिकेकडून ही प्रक्रिया गुपचूप राबविली जात आहे. त्यासाठी कोणतीही जाहीर सूचना काढण्यात आली नाही अशी तक्रार त्यांनी आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे केली आहे.
महापालिका अधिनियमानुसार सार्वत्रिक निवडणुकीनंतर एक महिन्याच्या स्वीकृत सदस्यांची नियुक्ती अपेक्षित होती. प्रत्यक्षात मात्र 16 जानेवारीला निवडणूक होऊ नये सहा महिने त्यावर निर्णय झालेला नाही. सत्ताधारी महायुती कायद्याची मोडतोड करून राजकीय सोय पहात आहे असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक जीन यांनी केला आहे.
या संदर्भात उच्च न्यायालयाने 29 सप्टेंबर रोजी निकाल दिला होता. त्यात एक आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र महापालिका प्रशासनाने त्याबाबत कोणतीही जाहीर सूचना प्रसिद्ध केली नाही. गटनेत्यांच्या मार्फत निवडणुकीचे अर्ज वितरण झाल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ आणि संशय असल्याचा आरोप नगरसेवक जीन यांनी केला.
नाशिक महापालिका कार्यालयाने आतापर्यंत 117 इच्छुकांचे स्वीकृत नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. यामध्ये सर्वाधिक 300 कार्यकर्ते भाजपच्या उमेदवारीसाठी रांगेत आहेत. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातही याबाबत एक मत होऊ शकलेले नाही. त्यामुळे नेत्यांची झालेली कोंडी व इच्छुकांची निवड या गोंधळात स्वीकृत नगरसेवक प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.