Kishtwar terrorist attack : किश्तवाडच्या जंगलात थरार! बेपत्ता दोन SPO जवानांचे मृतदेह आढळले, अंगावर काटा आणणारी दहशतवाद्यांची क्रूरता उघड

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडच्या जंगलात बेपत्ता असलेल्या दोन SPO जवानांचे मृतदेह आढळले. या घटनेतील दहशतवाद्यांच्या क्रूरतेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाचा सविस्तर बातमी.
Kishtwar terrorist attack : किश्तवाडच्या जंगलात थरार! बेपत्ता दोन SPO जवानांचे मृतदेह आढळले, अंगावर काटा आणणारी दहशतवाद्यांची क्रूरता उघड
Sarkarnama
Published on: 
Updated on: 

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी बेपत्ता झालेल्या 2 स्पेशल पोलिस ऑफिसर (SPO) जवानांचे मृतदेह गुरुवारी दच्छन परिसरातील जंगलात आढळून आले. दोन्ही जवानांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू केली आहे.

बाबी चंद (57) आणि रशपाल कुमार (45) हे दोघेही स्थानिक पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपमध्ये (SOG) कार्यरत होते. बुधवारी ते दच्छन येथील कियार गावातील आपल्या कॅम्पमधून धरना-मरवाह परिसरातील लष्करी चौकीच्या दिशेने जात होते. मात्र, प्रवासादरम्यान त्यांचा संपर्क तुटला. त्यांच्या मोबाईलवर संपर्क होऊ शकत नसल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. नंतर त्यांचे फोन बंद असल्याचेही समोर आले.

Kishtwar terrorist attack : किश्तवाडच्या जंगलात थरार! बेपत्ता दोन SPO जवानांचे मृतदेह आढळले, अंगावर काटा आणणारी दहशतवाद्यांची क्रूरता उघड
राजकीय वर्तुळात मोठी पोकळी! सलग 3 वेळा आमदार राहिलेल्या टीएमसीच्या दिग्गज नेत्याची एक्झिट

त्यानंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम तीव्र केली. दुर्गम डोंगराळ भाग आणि घनदाट जंगलांमध्ये ड्रोन तसेच श्वानपथकांच्या मदतीने बेपत्ता जवानांचा शोध घेण्यात येत होता. अखेर गुरुवारी दच्छनच्या जंगलात दोघांचे मृतदेह आढळले. सूत्रांच्या माहितीनुसार, ते बेपत्ता झालेल्या ठिकाणापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर होते. दोन्ही जवानांच्या शरीरावर गोळ्यांच्या अनेक खुणा आढळल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, मृतदेहाजवळ त्यांची शस्त्रे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे अपहरण आणि हत्येमागे दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय अधिक बळावला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी किश्तवाडच्या उंच डोंगराळ भागात सुरक्षा दलांकडून घेराव आणि शोधमोहीम सुरू आहे.

दरम्यान, किश्तवाडच्या भाजप आमदार शगुन परिहार यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांच्या माहितीनुसार, पहिला मृतदेह सकाळी 8 वाजता, तर दुसरा मृतदेह सकाळी 9 वाजता आढळला. त्यांनी पाकिस्तानवर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Kishtwar terrorist attack : किश्तवाडच्या जंगलात थरार! बेपत्ता दोन SPO जवानांचे मृतदेह आढळले, अंगावर काटा आणणारी दहशतवाद्यांची क्रूरता उघड
Sinnar Milk Adulteration: सिन्नरच्या दूध भेसळ रॅकेटपुढे तुकाराम मुंढेही हतबल? नागरिकाचा आंदोलनाचा इशारा

या घटनेनंतर किश्तवाडमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, दहशतवाद्यांचा शोध आणि हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान सुरक्षा यंत्रणांसमोर आहे.