Nashik NMC : नाशिकच्या स्थायी सभापतींनी निधीसाठी ठोठावलं शिंदे-फडणवीसांचं दार, कशासाठी हवेत 500 कोटी?

Machhindra Sanap demand : नाशिकमध्ये कुंभमेळ्यानिमित्ताने एकीकडे हजारो कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. असे स्थायी सभापतींनी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदेंकडे ५०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.
Nashik NMC, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Machhindra Sanap
Nashik NMC, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Machhindra SanapSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक महापालिकेत भाजपने १२२ पैकी ७२ जागा जिंकत स्वबळावर सत्ता मिळवली. मात्र तरीही शेवटच्या क्षणी भाजपने शिवसेना (शिंदे) गटाला सत्तेत सहभागी करुन घेतलं. शिवाय उपमहापौरपदही शिवसेनेला दिलं. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत परस्परविरोधी लढणारे दोन्ही पक्ष सत्तास्थापन करताना एकत्र आले. त्यामुळे नाशिकमध्ये आता शिवसेना व भाजप एकत्रित सत्तेत आहेत. भाजपचे ७२ व शिवसेनेचे २६ नगरसेवक आहेत.

या नगरसेवकांना प्रशासकीय राजवटीत गेल्या चार वर्षांतील मोठ्या प्रमाणावरील विकासाचा बॅकलॉग भरून काढणे आवश्यक झाले आहे. या चार वर्षांत प्रलंबित समस्यांचे निराकरण आणि प्रभागनिहाय विकास कामे करण्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

नुकतेच नाशिक महापालिकेचे २०२६ -२७ आर्थिक वर्षासाठी ३ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. मात्र, या अंदाजपत्रकात ३१ प्रभागातील १२२ नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात विकासकामे करण्यासाठी केवळ एकुण ५० कोटी रुपये देणार आहेत. मात्र नगरसेवकांनी आपल्या प्रत्येक प्रभागात २० कोटी रुपयांची कामे सूचवली आहेत. म्हणजे जवळपास पाचशे ते सहाशे कोटींचे कामे सूचवली आहेत. परंतु प्रत्यक्षात त्यांना केवळ ५० कोटी रुपये मिळाले आहेत.

Nashik NMC, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Machhindra Sanap
Girish Mahajan : गुलाबराव पाटलांशी अघोषित करार? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र ; जळगावात खळबळ

सन २०२७ मध्ये कुंभमेळा होत असून या निमित्ताने शहरात साधरण १० हजार कोटी रुपयांची कामे सुरु आहे. मात्र नगरसेवकांना हवी असलेली कामे या निधीतून होत नाहीत. नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात विकास कामे करण्यासाठी स्वतंत्र निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी अंदाजपत्रकातील ५० कोटी रुपयांचा निधी पुरेसा नाही. त्यासाठी नगरसेवकांना त्यांच्या प्रभागांमध्ये विकासकामे करण्यासाठी विशेष निधीची आवश्यता आहे.

Nashik NMC, Eknath Shinde, Devendra Fadnavis, Machhindra Sanap
Rajabhau Waje : GRMP पेक्षा कमी दराने खरेदी केली तर व्यापाऱ्याला दंड-कारावास ; शेतकऱ्यांसाठी खासदार वाजेंनी मांडले खासगी विधेयक

चार वर्षांनी लोकनियुक्त नगरसेवकांची सत्ता आल्याने जनतेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रभागातील रस्ते दुरुस्ती व नवीन रस्ते बांधकाम पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणा व नवीन जलवाहीनी टाकणे, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज व पावसाळी सांडपाणी व्यवस्था सक्षमीकरण, दवाखाने व आरोग्य सुविधा वाढविणे, सार्वजनिक उद्याने, स्वच्छतागृहे व नागरी सुविधा विकसित करण्यासाठी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी ५०० कोटी रुपयांचा निधी मिळावा या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दरवाजा ठोठावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com