Paper Leak : '7 लाख विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी ओतले? शिक्षणमंत्री राजीनामा द्या', शिक्षक आमदाराने फडणवीस सरकारला झोडपले

Jayant Asgaonkar On Maharashtra TET Exam Paper Leak : नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच, राज्यात रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर देखील फुटला आहे. यामुळे आता सरकारवर टीका होताना दिसत आहे.
TET Exam Paper Leak; Maharashtra school education minister Dada Bhuse
TET Exam Paper Leak; Maharashtra school education minister Dada Bhusesarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच, राज्यात रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना समोर आलेली आहे. ही घटना अतिशय गंभीर असून जवळपास 7 लाख विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. सरकार आमदार खासदार फोडण्यामध्ये व्यस्त आहे. इकडे तरुणांच्या कष्टावर पाणी फिरले आहे. या प्रकरणाची शालेय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार जयंत आसगावकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

आमदार आसगावकर म्हणाले, राज्यातील टीईटी पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थी व शिक्षकांच्या भविष्यावर अन्याय झाला आहे. अनेक वर्ष मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करणाऱ्या शिक्षकांचा विश्वास या घटनेमुळे डळमळीत झाला आहे. या प्रकरणातील सर्व दोषींवर कोणताही भेदभाव न करता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या सर्व संबंधित व्यक्ती, अधिकारी आणि दलाल यांची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. अशी मागणी आमदार आसगावकर यांनी केली.

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, प्रश्नपत्रिके्ची गोपनीयता, डिजिटल देखरेख आणि पारदर्शक यंत्रणा विकसित करावी. तसेच प्रामाणिक उमेदवारांच्या हिताचे संरक्षण करून भरती प्रक्रिया वेळेत आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्यात यावी. टीईटी परीक्षेसाठी राज्यभरातील हजारो कार्यरत शिक्षकांनी शाळेचे दिवसभराचे कामकाज सांभाळत, विशेषतः महिला शिक्षकांनी घर आणि नोकरीच्या दुहेरी जबाबदाच्या पार पाडत रात्रदिवस अभ्यास केला आहे. अशा परिस्थितीत परीक्षा रद्द करण्याची वेळ येणे म्हणजे या सर्व शिक्षकांच्या कष्टांवर पाणी फेरण्यासारखे आहे.

TET Exam Paper Leak; Maharashtra school education minister Dada Bhuse
TET Paper Leak : परीक्षेच्या एक दिवस आधीच टीईटीचा पेपर फुटला ; शिक्षणमंत्री दादा भुसेंकडून रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांना गंभीर इशारा

परीक्षा व्यवस्थेतील निष्काळजीपणा, ढिसाळ नियोजन आणि वारंवार घडणाऱ्या पेपरफु्टीच्या घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाच्या शिक्षकांच्या भविष्याशी खेळ केला जात आहे. याची संपूर्ण नैतिक जबाबदारी शिक्षण विभाग आणि शिक्षणमंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे. केवळ चौकशीच्या घोषणा करून चालणार नाही.

TET Exam Paper Leak; Maharashtra school education minister Dada Bhuse
TET Paper Leak : टीईटीचा पेपर फुटला.. कुठून आणि कसा बाहेर आला पेपर? ठाणे कनेक्शनही समोर

जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी...

दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अनेक शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त करत, "प्रामाणिकपणे अभ्यास करणा्यांवर अन्याय आणि गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांना अभय" अशी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यामुळे टीईटी पेपरफुटीच्या गंभीर पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी आमची ठाम मागणी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com