NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार फुटण्याची शक्यता भास्कर भगरे यांनी फेटाळली!

Nashik NCP Sharad Pawar party MP Bhaskar Bhagre rejects possibility of nationalist split-खासदार भास्कर भगरे यांनी विरोधी पक्षात राहूनही उत्कृष्ट काम करता येते असा दावा केला
Bhaskar_Bhagare & Sharad Pawar
Bhaskar_Bhagare & Sharad PawarSarkarnaam
Published on
Updated on

MP Bhaskar Bhagre News: महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर द्वारे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांना फोडण्यात आले. त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामांना निधी देण्याचे अमिष दाखवले होते. या आमिषाला उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार बळी पडले. 

या घटनेनंतर देशभरातील विरोधी पक्षांच्या खासदारांना फोडण्याचे काम सुरू असल्याचे लपून राहिले नाही. आप, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात फूट पाडण्यात सत्ताधारी यशस्वी झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चर्चा सुरू आहे. 

यासंदर्भात पक्षाचे नेते शरद पवार यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लवकरच महाराष्ट्रात लोकप्रतिनिधीनसह दौरे करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी मोठे विधान केले आहे.

Bhaskar_Bhagare & Sharad Pawar
Shivsena Opration Tiger Sharad Pawar And Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार मैदानात

खासदार भास्कर भगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा केला आहे. याबाबतच्या बातम्या केवळ माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाणीवपूर्वक या बातम्या पेरल्या जातात, असे ते म्हणाले. 

Bhaskar_Bhagare & Sharad Pawar
Bhaskar Bhagre : पवारांच्या नाशिकच्या शिलेदाराने खासदार फुटीच्या चर्चा फेटाळल्या, शरद पवारांच्या कारकिर्दीचा दाखला देत काय म्हणाले?

विरोधी पक्षातील खासदारांची कोंडी करण्याचा सत्ताधारी पक्षाकडून सतत प्रयत्न होत असतो. निधीचे देखील कमतरता आहे, हे नाकारून चालणार नाही. मात्र अशा गोष्टींना आम्ही भीक घालत नाही, असे खासदार भगरे म्हणाले. 

विरोधी पक्षात राहून देखील उत्तम काम करता येते, याचे उदाहरण ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत. शरद पवार यांनी विरोधी पक्षात राहून आपली एक प्रतिमा तयार केली आहे. देशाच्या राजकारणात त्यांना एक प्रतिष्ठित स्थान आहे, हे सत्ताधारी नेते देखील उघडपणे मान्य करतात. 

आजही जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या असंख्य समस्या आहेत. कांदा, द्राक्ष उत्पादक आणि अन्य शेतकऱ्यांच्या अडचणींना सत्ताधारी पक्षाचे धोरण कारणीभूत आहे. त्यावर सत्ताधारी तोंड उघडायला तयार नाही.

विरोधी पक्ष याबाबत सरकार विरोधात भूमिका घेऊन प्रखर आंदोलन करीत आहेत. सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम विरोधी पक्षांकडूनच होत आहे. सामान्य जनतेला सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधी पक्षांविषयी अधिक आपुलकी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कोणतीही फूट पडण्याची शक्यता नाही, याचा पुनरुच्चार खासदार भगरे यांनी केला आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com