Ashok Kharat Crime: अशोक खरातचे केबिनमधील व्हिडीओ 21 राज्यांसह परदेशापर्यंत पोहोचले, क्लिप विक्रीचं रॅकेट? तपासात धक्कादायक खुलासा

Nashik Ashok Kharat News: एसआयटीनं भोंदूबाबा अशोक खरात विरोधात कारवाईचा फास आवळला आहे. पोलिसांकडे आत्तापर्यंत तब्बल 30 जणांनी त्याच्याविरोधात साक्ष नोंदवली असून खरातने योनी पूजेच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार केले. त्याचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
Ashok Kharat Case
Ashok Kharat Case Sarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Nashik Crime Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या महिलांचं लैंगिक शोषण,कोट्यवधी रुपयांची फसवणूक,जमीनगैरव्यवहार यांसह अनेक गुन्ह्यांमध्ये कारवाईचा फास आवळण्यात आला आहे. या प्रकरणात एसआयटीच्या तपासात अनेक धक्कादायक बाब समोर येत आहे.याचदरम्यान,अशोक खरातचे केबिनमधील व्हिडीओ हे महाराष्ट्र राज्यच नव्हे तर इतर 21 राज्ये,काही केंद्रशासित प्रदेश यांसह श्रीलंका,नायजेरिया, यूएई यांसारख्या देशांतही व्हायरल झाल्याची हादरवणारी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

एसआयटीनं भोंदूबाबा अशोक खरात विरोधात कारवाईचा फास आवळला आहे. पोलिसांकडे आत्तापर्यंत तब्बल 30 जणांनी त्याच्याविरोधात साक्ष नोंदवली असून खरातने योनी पूजेच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार केले. त्याचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. यानंतर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली होती.

एसआयटी प्रमुख IPS तेजस्वी सातपुते यांनी अशोक खरात प्रकरणात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यावेळी खरात प्रकरणाशी संबंधित सोशल मीडियावरील आत्तापर्यंत 4 हजार 650 लिंक्स सोशल प्लॅटफॉर्मवरून डिलिट केल्याची माहिती दिली होती. तसेच व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आल्याचंही सांगितलं होतं.

तसेच ज्या सोशल अकाऊंटवरून हे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले असे 450 अकाऊंट देखील कायमस्वरुपी बंद करण्यात आले असून ते डिलिट करण्यात आल्याची माहिती दिली होती. पीडितांची ओळख समोर येऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहे.

Ashok Kharat Case
Mamata Banerjee TMC Formation : सोनिया गांधी, सिताराम केसरी ते प्रणब मुखर्जी.. काँग्रेसमधील दिग्गजांना नडून ममतांनी 'तृणमूल'ची स्थापना केली : हायव्होल्टेज ड्राम्याची इनसाईड स्टोरी

पण आता सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या केबिनमधील व्हिडीओंचा महाराष्ट्राच नाही,तर इतरही 21 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांपर्यंत व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नायजेरिया, यूएई, श्रीलंका, फिलिपाईन्स या देशांतही खरातचे व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती आहे.

अशोक खरातशी आक्षेपार्ह कंटेंट विक्री व प्रसार करणारे 74 टेलिग्राम ग्रुप तसेच बनावट अकाऊंट शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 406 आक्षेपार्ह पोस्ट,व्हिडीओ आणि फोटो हटवले आहेत. हादरवणारी माहिती म्हणजे यापैकी काही ग्रुपद्वारे अवघ्या 20 रुपयांना विकले गेल्याची खळबळजनक माहितीही पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

Ashok Kharat Case
Farmer Loan Waiver : याआधी कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

अशोक खरातविरोधात एकूण 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात लैंगिक अत्याचार,आर्थिक फसवणूक आणि 'महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत काही गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

आता याप्रकरणी सायबर पोलिसांनी खरातचे आक्षेपार्ह व्हिडीओ डाउनलोड, खरेदी-विक्री किंवा व्हायरल न करण्याचे आवाहन केलं आहे. यासंबंधी काही लिंकसह ग्रुप निदर्शनास आल्यास तात्काळ तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com