Nashik Municipality : शिंदे गटाचा प्रभाव? संशय, तक्रारी, आरोप…नाशिक प्रभागरचनेने सारे शांत केलं

Nashik Prabhagrachna : नाशिकमध्ये महायुतीमध्येच प्रभागरचेवरुन वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिंदे गटाविषयी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या.
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Municipality : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागरचना जाहीर होण्यापूर्वी महायुतीमध्ये संशयास्पद फेरबदल झाल्याच्या संशयावरुन वाद निर्माण झाला होता. नगरविकास भागागाकडून प्रभागरचनेचा आराखडा आयोगाला सादर करण्यात आला होता. नगरविकास विभाग एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असल्याने प्रभागरचनेवर शिवसेना (शिंदे गटाचे) प्राबल्य राहण्याच्या संशयातून भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रभागरचना जैसे थे राहिल्याने या वादावरही पडदा पडला आहे.

नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभागरचना शुक्रवारी (ता. २२) रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. त्यात नाशिक महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली आहे. गत निवडणुकीप्रमाणे २०११ च्या लोकसंख्येनुसार १२२ सदस्य संख्या कायम राहिली आहे. तसेच चार सदस्यीय प्रभाग पद्धत आणि प्रभागरचनेच्या प्रक्रियेत देखील कुठलाही बदल झालेला नाही. २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभागरचना आहे तशीच राहिली आहे. मागील प्रभागरचनेप्रमाणे चार सदस्यीय २९ तर तीन सदस्यीय दोन अशाप्रकारे पूर्वीप्रमाणेच ३१ प्रभाग अस्तित्वात आले आहेत. तसेच गेल्यावेळ प्रमाणे यंदाही १५ व १९ हे प्रभाग तीन सदस्यीय कायम राहिले आहेत.

नाशिकमध्ये प्रभागरचेवरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली होती. नगर विकास विभागाकडे प्रारुप प्रभागरचना सादर केल्यानंतर त्यात मोठ्या स्वरुपात फेरबदल झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. विशेष करुन नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने या प्रभागरचनेवर शिंदे गटाचा प्रभाव राहील असे बोलले जात होते. अशा स्थितीत स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय झाल्यास भाजप व राष्ट्रवादीला याचा फटका बसेल या शंकेने दोन्ही पक्षांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र प्रभागरचनेत तसा कोणताही बदल झालेला नसल्याने हा वाद आता मिटला आहे.

Nashik Municipal Corporation
Laxman Hake statement : ओबीसीत फूट? माळी समाजाबाबतच्या वक्तव्यामुळे हाके अडचणीत, भुजबळांशी फोनवर चर्चा

जानेवारीत निवडणुकांची शक्यता

राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार या प्रभाग रचनेवर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. त्यानंतर १२ सप्टेंबरपर्यंत त्यांची सुनावणी होईल. राज्य निवडणूक आयोग ६ ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणार आहे. अंतिम प्रभाग निश्चित झाल्यानंतर मतदार यादीची तपासणी सुमारे दीड महिना चालणार असून त्यात हरकती व सूचनांचादेखील विचार केला जाईल. त्यामुळे येत्या वर्षी जानेवारीत निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nashik Municipal Corporation
Sharad Pawar : मतदारयाद्या मॅनेज, प्रभाग रचना सरकारपुरस्कृत : शरद पवारांसह संपूर्ण पक्षाचाच राहुल गांधींच्या सुरात सूर

४८ हजार नागरिकांचा प्रभाग

प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत लोकसंख्येचे प्रगणक गट एकत्र करून त्यांची जुळवणी करण्यात आली. या पद्धतीनुसार प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या निश्चित झाली असून, सरासरी एका प्रभागामध्ये सुमारे ४८ हजार नागरिकांचा समावेश झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com