Nashik News, 10 Jun : नाशिक महापालिका आर्थिक सक्षम महापालिका आहे. मात्र प्रशासनाचा विकासाच्या नावाने कोतेपणा नेहमीच दिसतो, असाच अनुभव शहरातील पाथर्डी या मुख्य गावाला आला. नाशिक महापालिका आपल्या आर्थिक सक्षमतेचा प्रचार नेहमीच करीत असते. शेकडो कोटींच्या योजना गाजावाजा करीत जाहीर केल्या. 3000 कोटींचे अंदाजपत्रक असलेली ही महापालिका आहे.
मात्र शहरातील खड्डे बुजविणे यावर नागरिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. या खड्ड्यांमुळे असंख्य अपघात झाले आहेत. अनेक नागरिकांना अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. पाथर्डी आणि गौळाणे या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अशीच दुरावस्था आहे. या संदर्भात स्थानिक नगरसेविका माधुरी ढेमसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र नियमांच्या अडथळ्यांमुळे त्याकडे दुर्लक्ष झाले.
अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका माधुरी ढेमसे यांनी स्वतःच पुढाकार घेतला. स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन या रस्त्याची दुरुस्ती केली. स्वतः दुरुस्ती करून त्यांनी हजारो कोटींच्या योजना राबवणाऱ्या महापालिकेला आरसा दाखवला आहे.
नाशिक महापालिका खड्डे बुजवण्यावर कोट्यावधींचा निधी खर्च करते. कुंभमेळ्याच्या नावाखाली 35000 कोटी खर्च केला जाणार आहे. सर्व निधी नेमका कोणासाठी खर्च होणार आहे हा गंभीर प्रश्न आहे. महापालिका शेकडो कोटींचे रस्ते करते. मात्र हे रस्ते आणि खड्डे बुजवणे यामध्ये गुणवत्तेचा आणि पारदर्शकतेचा अभाव आहे.
याबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. गैरव्यवहाराच्या तक्रारी थेट शासनापर्यंत पोहोचले आहेत. असे असताना गावकऱ्यांसाठी महत्त्वाचा रस्ता प्रशासन करत नाही. अपघात होऊन एका नागरिकाचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे स्वतः पुढाकार घेऊन हा रस्ता दुरुस्त करावा लागला. महापालिकेने आणि अधिकाऱ्यांनी त्याचा बोध घेऊन या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन महापालिके विरुद्ध पुन्हा आवाज उठवावा लागेल असा इशारा त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.