Krushna Andhale : कृष्णा आंधळेबाबत नाशिक पोलिसांनी दिली मोठी माहिती; ‘सीसीटीव्ही फुटेजमधील ती व्यक्ती...’ (Video)

Santosh Deshmukh Murder Case : नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरमधील दत्त मंदिर परिसरात कृष्णा आंधळे दिसल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी परिसरात कृष्णा आंधळे याचा शोध घेतला.
Santosh Deshmukh-Krushna Andhale
Santosh Deshmukh-Krushna AndhaleSarkarnama
Published on
Updated on

Nashik, 13 March : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. आंधळे हा नाशिकमध्ये फिरत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी बुधवारी (ता. 12 मार्च) केला होता. मात्र, नाशिक पोलिसांनी बुधवारी दिवसभर केलेल्या तपासातून नवीन माहिती पुढे आली आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसणारी ती व्यक्ती कृष्णा आंधळे नसून दुसरीच कोणीतरी आहे, असा दावा नाशिक पोलिसांनी केला आहे. मात्र, आंधळेबाबत आणखी तपाणी सुरू आहे, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.

नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरमधील दत्त मंदिर परिसरात कृष्णा आंधळे (Krushna Andhale) दिसल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी परिसरात कृष्णा आंधळे याचा शोध घेतला. परिसरातील उपलब्ध सीसीटीव्हीची तपासणी केली. मात्र, त्या दिवसभराच्या तपासणीत कृष्णा आंधळे हा नाशिक परिसरात असल्याचा एकही पुरावा पोलिसांना सापडला नाही.

संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या खुनाच्या घटनेला तीन महिने होऊन गेले आहेत. या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. मात्र, तो फरार आरोपी कृष्णा आंधळे हा गंगापूर रोड परिसरात आढळल्याची माहिती एका स्थानिक नागरिकाने दिली होती. सहदेव नगरमधील दत्त मंदिरात मास्क घालून उभे असलेले दोघे मला दिसले होते. त्यातील एकाने मास्क खाली घेतल्यानंतर तो कृष्णा आंधळे असल्याचे मी ओळखले. त्याबाबत मी तातडीने पोलिसांनी सांगितले. पोलिस येईपर्यंत ते मखमालच्या दिशेने पळून गेले, असा दावा स्थानिकांनी केला आहे.

Santosh Deshmukh-Krushna Andhale
Jayant Patil : ‘माझं काही खरं नाही’ असे सांगून खळबळ उडविणारे जयंतराव दुसऱ्याच दिवशी म्हणतात, ‘माझं भाषणं करणंही आता अवघड झालंय’

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी तातडीने शोध मोहिम हाती घेतली. परिसरातील सर्वच ठिकाणी त्यांनी तपासणी केली होती, मात्र कृष्णा आंधळे त्यांना कुठेही दिसला नाही. नाशिक पोलिसांनी बुधवारी दिवसभर कृष्णा आंधळेचा शोध घेतला.

Santosh Deshmukh-Krushna Andhale
Nandgaon politics: आमदारसाहेब, तुमची बहीण मारली ‘या’ लोकांनी...,म्हणत तिनं प्रियकरासह जीवन संपवलं! नांदगावमध्ये काय घडलं?

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्याचा निर्णय घेतला. परिसरातील सर्व सीसीटीव्हीची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली, त्यातून कृष्णा आंधळे याची ओळख पटविण्याचा प्रयत्न पाेलिसांनी केला आहे. मात्र, सीसीटीव्हीत दिसलेला व्यक्ती कृष्णा आंधळे हाच होता, याचा कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती आलेला नाही. मात्र, त्याबाबतचा तपास आणखी गतीने करण्यात येत आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com