Nandgaon News: एकविसाव्या शतकातील २५ वे वर्ष सुरू आहे. मात्र अद्यापही समाजसुधारकांनी अनेक प्रयत्न करूनही जागरूकता निर्माण झालेली नाही. याचा अनुभव नस्तनपुर (नांदगाव) येथे घडलेल्या प्रेमीयुगलाने जीवन संपविल्याच्या घटनेतून पुढे आला आहे.
नस्तनपुर (नांदगाव) येथील एक विधवा महिला आणि गावातीलच एका विवाहित व्यक्तीचे प्रेम संबंध होते. यातून हा प्रकार घडला आहे. महिलेने आपले जीवन संपविण्यापूर्वी एक पत्र लिहिले. त्यातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यात सोळा जणांनी त्यांना कसा त्रास दिला, याचे वर्णन आहे.
या संदर्भात महिलेने भावनिक साद घालत, आमदार आणि पोलिसांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आम्हाला त्रास देणाऱ्या गावातील लोकांवर कारवाई करावी. आम्ही कोणाचेही नुकसान केले नसताना आमच्यावरही ही वेळ आल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे.
संबंधित महिला विधवा व किराणा दुकाानदार असल्याचे कळते. तिचे गावातील एका विवाहित व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. त्यांना विवाह करायचा होता. मात्र विवाहित व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्याला विरोध केला. त्यांना परावृत्त करण्यासाठी त्यांनी विविध प्रकारे दबाव आणला.
या संदर्भात चिठ्ठीत लिहिल्यानुसार संबंधित १६ जण त्यांच्यातील एकाचे नातेवाईक आहेत. त्यांना गेले पंधरा दिवस सातत्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या लोकांनी आमचे आमदार तसेच माजी आमदार संजय पवार व पोलिस अधिकाऱ्यांशी घनिष्ट संबंध आहे. आम्ही खून केला तरी आमचे काहीही नुकसान होणार नाही. आमच्यावर कोणीही कारवाई करू शकणार नाही, असे चिठ्ठीत म्हटले आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात, शेवटी आमदार साहेब तुमची बहीण या लोकांनी मारली. आम्हाला जगायचे होते. आम्ही कोणाचेही नुकसान केलेले नाही. तरीही त्यांनी आमच्यावर ही वेळ आणली. त्यामुळे न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन केले आहे.
या पत्रात छळ करणाऱ्या १६ जणांची नावे लिहिण्यात आली आहे. यामध्ये अरुण उर्फ रामा मधुकर गायकवाड हा प्रमुख असल्याचे म्हटले आहे. संबंधित प्रेमीयुगलाने नस्तनपुर येथे रेल्वे गाडीखाली आपले जीवन संपविले. या संदर्भात पोलिसात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. अतिशय धक्कादायक प्रकरण म्हणून याकडे पाहिले जात आहे. या घटनेबाबत अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून ते तपास करीत आहेत.
-----
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.