Nashik BJP : नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची युती झाली तरी भाजप रेटणार नाही, काय सांगतात गत निवडणुकीचे आकडे?

Despite a possible Thackeray brothers' alliance, BJP remains dominant in Nashik. Past election results show BJP’s clear lead in municipal polls. भाजपला कोणत्याही परिस्थिती नाशिक मनपावर सत्ता आणायची आहे, त्यासाठी भाजपचा मोठा आटापिटा सुरु आहे. त्यासाठी भाजप स्वबळावर लढण्याचा निर्णयही घेऊ शकते.
Raj Thackeray, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Nashik.
Raj Thackeray, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Nashik.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Municipal Election 2025 : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे. त्यासाठी भाजपने नाशिकमध्ये मोठी इनकमिंग मोहिम राबवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक नेत्यांना भाजपने गळाला लावत आपल्या पक्षात प्रवेश दिला. भाजपला कोणत्याही परिस्थिती नाशिक मनपावर सत्ता आणायची आहे, त्यासाठी भाजपचा मोठा आटापिटा सुरु आहे. त्यासाठी भाजप स्वबळावर लढण्याचा निर्णयही घेऊ शकते.

परंतु राज ठाकरे व उद्दव ठाकरे यांच्यात मराठीच्या मुद्द्यावरुन झालेलं मनोमिलन पाहाता भाजपसह महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर दोन्ही ठाकरे बंधूनी युती केली तर केवळ मुंबई महापालिकाच नव्हे तर राज्यातील इतरही महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे गणित बदलू शकते. नाशिक महापालिका निवडणुकीतही त्याचा निश्चितच परिणाम होईल असं बोललं जात आहे.

नाशिकमध्ये मनसेच्या स्थानिक नेत्यांनाही शिवसेना(उबाठा)सोबत युती करण्याची इच्छा आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूची युती झाल्यास त्यांची ताकद वाढणार आहे. मात्र भाजपला त्याचा कितपत फटका बसेल? किंवा बसणार नाही. यावरुन सध्या राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढवले जात असून अंदाज वर्तवण्यात येत आहेत.

Raj Thackeray, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Nashik.
Dhule Congress : भाजपने झटका दिल्यानंतर धुळ्यात कॉंग्रेस अॅक्टीव मोडवर, राजकीय हालचालींना वेग

मागील निवडणुकीमध्ये भाजपने नाशिक महापालिकेत निर्विवाद सत्ता काबीज केली होती. 122 पैकी भाजपने 67 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेना 34 जागा मिळवत दुसऱ्या स्थानावर होती. मात्र मनसेला केवळ 5 जागांवर विजय मिळाला होता. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी सहा जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे गत निवडणुकीतील आकड्यांचा खेळ पाहाता शिवसेना व मनसे केवळ 39 जागा होतात. तर भाजपने एकट्याने 67 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूची युती जरी झाली तरी भाजपला टक्कर देणं शक्य होणार नाही असच दिसतं.

Raj Thackeray, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Nashik.
Eknath Khadse : गुजरात 45 वर्षांपासून पाणी घेतंय, खडसेंनी महाजनांना घेरलं... पण झालं उलटंच !

त्यात यावेळी शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून अनेक मात्तबर नेत्यांनी भाजपात व शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. त्यामुळे आधीच शिवसेनेची (उबाठा) ताकद विभागली गेली आहे. अशात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र जरी लढले तरी फारसा प्रभाव पाडू शकणार नाही असं राजकीय तज्ञ सांगतात. मात्र अशा परिस्थिती दोन्ही ठाकरें बंधूंच्या प्रभावापासून वाचण्यासाठी भाजप स्वबळाचा विचार न करता महायुती म्हणून लढण्याचा विचार करु शकतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com