Nashik Pune Train Project Delay : नाशिक-शिर्डी रेल्वेला वेग, अहमदाबादच्या रेल्वे प्रकल्पाला गती; पण नाशिक-पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प 'थंडबस्त्यात'?

Land acquisition begins Nashik-Shirdi railway line, raising fresh concerns over future Maharashtra ambitious Nashik-Pune semi high-speed rail Project : नाशिक-शिर्डी दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाला अखेर वेग मिळत असतानाच, महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं भवितव्य नेमकं काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Nashik Pune Train Project Delay
Nashik Pune Train Project DelaySarkarnama
Published on
Updated on

Nashik Pune Railway Project Latest Update : नाशिक-शिर्डी दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाला अखेर वेग मिळू लागला असून, प्रशासनाने आता प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. तब्बल 80 किलोमीटरच्या या रेल्वेमार्गासाठी नाशिक आणि सिन्नर तालुक्यातील 32 गावांमधील जमिनी संपादित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

मात्र याच घडामोडींमुळे आता महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं भवितव्य नेमकं काय? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक (Nashik)-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग हा सुमारे 231 ते 235 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित प्रकल्प आहे. सुरुवातीला हा मार्ग पुणे (हडपसर)-चाकण-मंचर-नारायणगाव-आळेफाटा-संगमनेर-सिन्नर-नाशिक असा निश्चित करण्यात आला होता. मात्र पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे उभारल्या जाणाऱ्या जागतिक दुर्बिण प्रकल्पामुळे या मार्गात मोठा बदल करण्यात आला.

यानंतर हा मार्ग बदलून शिर्डीमार्गे (Shirdi) नेण्याचा प्रस्ताव समोर आला आणि इथूनच वादाला सुरुवात झाली. मूळ रेल्वेमार्गावर असलेल्या अनेक गावांतील नागरिकांनी या नव्या प्रस्तावाला जोरदार विरोध दर्शवला. स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील एकत्र येत केंद्र आणि राज्य सरकारवर दबाव वाढवण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण आंदोलनात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेतला.

Nashik Pune Train Project Delay
Satyajeet Tambe Pune Nashik Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ‘डब्यात’? सत्यजीत तांबेंचा रेल्वे मंत्रालयाला थेट इशारा

या मुद्द्यावर विधानसभा अधिवेशनातही आवाज उठला. संगमनेरचे आमदार अमोल खताळ, अकोल्याचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी सरकारचं लक्ष वेधलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिकांच्या मागणीची दखल घेत अभ्यास समिती स्थापन करून अहवाल मागवला असून, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं आहे.

Nashik Pune Train Project Delay
Sangamner Rail News : पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड प्रकल्प गुंडाळला? आता गुजरातमधून धावणार पहिली सेमी-हाय-स्पीड रेल्वे; केंद्र सरकारची मंजुरी

दरम्यान, आता नाशिक-शिर्डी दुहेरी रेल्वेमार्गासाठी प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया वेगात सुरू केली आहे. याचवेळी केंद्र सरकारने गुजरातमधील अहमदाबाद-धोलेरा सेमी हायस्पीड ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. हा भारतातील पहिला स्वदेशी सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मानला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत शंका आणखी गडद झाल्या आहेत.

राज्यातील नागरिकांमध्ये आता एकच चर्चा रंगू लागली आहे. गुजरातमधील प्रकल्पांना सातत्याने मंजुरी मिळते, मग महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांकडे दुर्लक्ष का? या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी यापूर्वीच इशारा दिला होता की, महाराष्ट्राला वारंवार डावललं जात आहे. हा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही.

आता नाशिक-शिर्डी रेल्वे प्रकल्पाला वेग मिळत असताना, दुसरीकडे नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प वाचवण्यासाठी आमदार तांबे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह राज्याचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com