Nashik Shalarth ID scam : नाशिकचे शिक्षण क्षेत्र हादरले, बोगस शालार्थ आयडीप्रकरणी 841 शिक्षक, अधिकाऱ्यांवर गुन्‍हे दाखल

Fake Shalarth IDs Nashik : नाशिक विभागातील शालार्थ आयडीचा महाघोटाळा अखेर उघड झाला आहे. याप्रकरणात शासनाला तब्बल 150 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
Nashik Shalarth ID scam
Nashik Shalarth ID scamSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक शिक्षण विभागातील शालार्थ आयडी प्रणालीत मोठा गैरप्रकार उघड झाला असून नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील 'शालार्थ' प्रणालीमध्ये बनावट आयडी तयार करून शासनाची सुमारे 150 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक श्रीधर विजयराव देवरे यांनी या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तत्कालीन तीन शिक्षण उपसंचालकांसह ८४१ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात नितीन उपासनी, भाऊसाहेब चव्‍हाण, नितीन बच्छाव यांचा संशयितांमध्ये समावेश आहे.

हा प्रकार सन २०१९ ते जून २०२५ या कालावधीत घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. राज्यातील शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 'शालार्थ आयडी' अनिवार्य आहे. मात्र, नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्याचा समावेश असलेल्या नाशिक विभागात कोणतीही अधिकृत वैयक्तिक मान्यता किंवा नस्ती उपलब्ध नसताना, बनावट आदेशांच्या आधारे 841 जणांचे शालार्थ आयडी प्रणालीत समाविष्ट करण्यात आले. या माध्यमातून शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचे वेतन बेकायदेशीरपणे लाटण्यात आल्‍याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Nashik Shalarth ID scam
Shivsena News : विधानसभेला बंडखोरी करणाऱ्या बड्या नेत्याची जिल्हा प्रमुख पदावर पुन्हा घरवापसी!

या घोटाळ्यात तत्कालीन प्रभारी उपसंचालक नितीन बच्‍छाव, शिक्षण उपसंचालक राहिलेले नितीन उपासनी आणि डॉ. भाऊसाहेब चव्‍हाण यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, दोन लेखाधिकारी आणि संबंधित जिल्ह्यांचे अधीक्षक यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत.

दरम्यान राज्याच्या शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार या प्रकरणाची एसआयटी मार्फत पडताळणी करण्यात आली होती. ज्या कर्मचाऱ्यांचे शालार्थ आदेश कार्यालयीन जावक क्रमांकाशी जुळत नाहीत किंवा ज्यांनी आपले आदेश पोर्टलवर अपलोड केले नाहीत, अशा 892 संशयास्पद आयडींपैकी 841 जणांवर थेट कारवाई केली आहे.

Nashik Shalarth ID scam
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंचा आदेश! सरकारने 316 अधिकाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता; दोन वर्षांपर्यंत कारावास...

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला असून गुन्‍हा दाखल झालेल्‍या शिक्षकांवर पुढे काय कायदेशीर कारवाई होते याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com