Shivsena UBT: ठाकरे समर्थकांनी सरसवल्या बाह्या; दिल्लीच्या आंदोलनाला नाशिकमधून जोरदार समर्थन, आज होणार रास्ता रोको!

Nashik Shiv Sena UPT Rajabhau Waje Delhi Jantar Mantar Support Anil Kadam Education NIPHAD- शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष दिल्लीतील आंदोलकाच्या पाठींब्यासाठी झाला सक्रिय, माजी आमदार अनिल कदम यांचा आज निफाडला रास्ता रोको
Shivsena UBT: ठाकरे समर्थकांनी सरसवल्या बाह्या; दिल्लीच्या आंदोलनाला नाशिकमधून जोरदार समर्थन, आज होणार रास्ता रोको!
Published on
Updated on

Anil Kadam News: नवी दिल्ली येथे जंतर मंतर मैदानात युवकांचे आंदोलन सुरूच आहे. विरोधी पक्षांनी त्याला जोरदार पाठिंबा दिला. नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी त्यासाठी जोरदार खिंड लढवली. 

नीट प्रश्नपत्रिका फुटल्याने युवकांनी नवी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू केले आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ते अडून बसले आहेत. विरोधी पक्षांनी त्यासाठी मोर्चे बांधणी केल्याने वातावरण तप्त आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आज मुंबईत जोरदार आंदोलन होत आहे. मराठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे रविवारी (ता.२६) आंदोलनासाठी एकत्र येत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे समर्थकांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

Shivsena UBT: ठाकरे समर्थकांनी सरसवल्या बाह्या; दिल्लीच्या आंदोलनाला नाशिकमधून जोरदार समर्थन, आज होणार रास्ता रोको!
Maharashtra News Live Update : अखेर 3 तासांनंतर पोलिसांनी राहुल गांधी यांना सोडलं

खासदार राजाभाऊ वाजे समर्थकांनी काल सिन्नर येथे जोरदार आंदोलन केले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. नीट व अन्य परीक्षांच्या पेपर फुटी संदर्भात केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. विशेषतः धर्मेंद्र प्रधान या मंत्र्याने ही जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. 

Shivsena UBT: ठाकरे समर्थकांनी सरसवल्या बाह्या; दिल्लीच्या आंदोलनाला नाशिकमधून जोरदार समर्थन, आज होणार रास्ता रोको!
MVA meeting : राज्यातील विरोधी पक्ष एकवटला; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून महाविकास आघाडी फुंकणार रणशिंग! आंदोलनाची दिशा ठरविणार

कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला यावेळी पाठिंबा जाहीर करण्यात आला. युवक करीत असलेल्या आंदोलनाला केंद्र सरकारने बळाचा वापर करून दडपू नये. नेता त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतील असा इशारा यावेळी देण्यात आला. 

आज सकाळी अकराला निफाड येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष रास्ता रोको आंदोलन करणार आहे. माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात महाविकास आघाडीचे घटक पक्ष सहभागी होतील

केंद्र सरकार अतिशय बेदरकारपणे वर्तन करीत आहे. विरोधी पक्षांना दुय्यम लेखून कोणत्याही विरोधी आवाजाची दखल घ्यायची नाही अशी हुकूमशाही प्रवृत्ती या सरकारमध्ये आहे. त्यामुळे देशातील लोकशाही भाजप सरकारने धोक्यात आणली आहे, असा आरोप माजी आमदार कदम यांनी केला. 

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे नाशिक, मालेगाव, मनमाड आणि जिल्ह्याच्या अन्य भागात यापूर्वी आंदोलन करण्यात आले आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याने देशातील शिक्षण व्यवस्था आणि युवकांचे भवितव्य संकटात आहे. त्या विरोधात देशभरातील नागरिक संतप्त असून त्यांच्या भावना आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. यासाठी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे समर्थकांनी बाह्या सरसावून आंदोलनाची भूमिका घेतली आहे. 

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com