Dr. Shrikant Shinde Politics: एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपचे गणित बिघडवणार?, श्रीकांत शिंदे म्हणतात, आमचा स्ट्राईक रेंट स्ट्रॉंग!

Nashik Shivsena Eknath Shinde party will spoil the municipal election figure politics of BJP-डॉ श्रीकांत शिंदे म्हणतात, एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री काळात विकासासाठी सर्वाधिक निधी दिला.
Dr Shrikant Shinde
Dr Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Nashik News: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने भाजपला अप्रत्यक्षरीत्या डिवचले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्ष मोठी कामगिरी करेल. आमचा पक्ष सगळ्यात पुढे राहील असा दावा नेत्यांनी केला आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी महायुती झाली नाही. त्यामुळे सध्या अनेक प्रभागांमध्ये महायुतीतच उमेदवार एकमेकांविरुद्ध सक्रिय झाले आहेत. आज खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना आक्रमक विधाने करीत त्याची चुणूक दाखवली.

https://www.youtube.com/watch?v=E8CjY9nug2cनाशिक महापालिकेच्या निवडणुकीत हंड्रेड प्लस असा निर्धार भाजपने केला आहे. यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन परिश्रम घेत आहेत. निवडणुकीची जोरदार मोर्चे बांधणी त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली.

Dr Shrikant Shinde
Blind School : बोगस दिव्यांगांवर मुंढेंची धडक कारवाई, पण शाळेने दाखवली आदेशाला केराची टोपली; धक्कादायक प्रकार उघडकीस

ते म्हणाले, महापालिका निवडणुकीचा निकाल काय लागेल? हे लवकरच स्पष्ट होईल. आकड्यांच्या खेड्यात मी जाणार नाही. मात्र नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीचे निकाल पुरेसे बोलके आहे.

Dr Shrikant Shinde
Nashik NMC Election: नाशिककर २८ विद्यमान नगरसेवकांना नक्की देणार नारळ, "हे" आहे कारण!

नगरपालिका निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक राहिलेला आहे. आम्ही १५५ ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिले होते. त्यातील ६४ आमच्या पक्षाचे नगराध्यक्ष झाले. हा शिवसेना शिंदे पक्षाचा स्ट्राईक रेट आम्ही कायम ठेवू.

नाशिक शहरात सगळीकडे शिवसेनेला अनुकूल वातावरण असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वाधिक नगरसेवक आमचे निवडून येतील असा विश्वास वाटतो. नाशिकचा आगामी महापौर देखील शिवसेनेचाच होईल असा दावा त्यांनी केला.

मावळत्या महापालिकेत शिवसेनेचे ३५ नगरसेवक होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष देखील आमच्यासोबत आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या निश्चितच वाढेल. त्याला मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे आणि दिलेला सर्वाधिक निधी ही कारणे आहेत.

आज सकाळी खासदार डॉ शिंदे यांचे शहरात आगमन झाले. त्यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ठिकठिकाणी उमेदवार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांची टाकळी येथे जाहीर सभा देखील झाली. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपला आव्हान देण्याचे प्रयत्न शिवसेना शिंदे पक्ष जोमाने करीत आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com