Nashik Kumbh Mela : साधुग्रामसाठी ११०० एकर जमिनीचे संपादन होणार; महिनाभरात शेतकऱ्यांकडून ताबा घेणार, भाडे किती देणार?

Nashik Kumbh Mela: 1,100 Acres of Land to Be Acquired for Sadhugram : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील साधुग्रामचा विस्तार करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ११०० एकर जमीन भाडेतत्त्वावर घेण्याची तयारी पूर्ण केल्याची माहिती आहे. महिनाभरात संपूर्ण जागेचा ताबा घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Nashik Kumbh Mela
Nashik Kumbh MelaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Kumbh Mela: 1,100 Acres of Land to Be Acquired for Sadhugram : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राम उभारण्यासाठी सुमारे ११०० एकर जमीन भाडेतत्त्वावर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. संबंधित जमीनमालकांशी करार करण्याची प्रक्रिया राबवून पुढील महिनाभरात संपूर्ण जागेचा ताबा घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमधील तिन्ही प्रमुख वैष्णव आखाड्यांसह त्यांच्याशी संलग्न सुमारे १२०० खालसे सहभागी होण्याची शक्यता आहे. याशिवाय पाच लाख साधू-महंत नाशिकमध्ये येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. या संभाव्य गर्दीचा विचार करून सिंहस्थ प्राधिकरणाने साधुग्रामचा विस्तार नांदूर-मानूरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुमारे ११०० एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहे. या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार असून, प्रत्यक्ष साधुग्राम उभारण्याची जबाबदारी नाशिक महापालिकेवर असणार आहे.

साधुग्रामसाठी जमीन भाडेतत्त्वावर घेण्याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. स्थानिक शेतकऱ्यांकडून जमीन घेताना त्यावरील घरे, जनावरांचे गोठे आणि अन्य मालमत्ता संपादनातून वगळण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, सिंहस्थ कुंभमेळा संपल्यानंतर जमीनमालकांना त्यांची जागा ज्या स्थितीत प्रशासनाने ताब्यात घेतली होती, त्याच स्थितीत परत करावी लागणार आहे. तसेच जमिनीचा ताबा घेताना परिसरातील एकाही झाडाची तोड करू नये, अशा स्पष्ट सूचनाही प्रशासनाने महापालिकेला दिल्या आहेत.

Nashik Kumbh Mela
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रेल्वेचा मेगा प्रोजेक्ट; मुंबई-भुसावळ वाहतूक कोंडीला पर्याय देण्यासाठी नवा मार्ग

साधुग्रामसाठी जमीन भाडेतत्त्वावर घेण्याच्या मोबदल्यावरून स्थानिक शेतकऱ्यांनी सुरुवातीला नाराजी व्यक्त केली होती. जिल्हा प्रशासनाने पहिल्यांदा मागील तीन वर्षांतील रेडीरेकनरच्या सरासरी दरानुसार भाडे निश्चित करून त्यावर सहा टक्के वाढ देण्याचे नियोजन केले होते. मात्र, हा मोबदला अपुरा असल्याचे सांगत स्थानिकांनी त्याला विरोध केला.

Nashik Kumbh Mela
कुंभमेळा म्हणजे नेमकं काय? सिंहस्थ नावामागचं रहस्य जाणून घ्या!

त्यानंतर सरकारच्या मार्गदर्शनानुसार प्रशासनाने मोबदल्याच्या निकषात बदल केला आहे. मागील तीन वर्षांतील रेडीरेकनर दर आणि प्रत्यक्ष जमीन व्यवहारांचे सरासरी दर यांची तुलना करून, यापैकी जो दर अधिक असेल तो आधार मानण्याचे ठरवले आहे. या दरावर आणखी सहा टक्के वाढीव मोबदला देण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे. दरम्यान, मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात जमीन भाडे आणि नुकसानभरपाई मिळून शेतकऱ्यांना एकरी सुमारे साडेअकरा लाख रुपये देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.