

Nashik kumbhmela News: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाची लगबग सुरू असतानाच साधूग्रामसाठी जमीन संपादनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 31 ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या उपस्थितीत ध्वजारोहण होणार असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांनी साधूग्रामसाठी जमीन देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. 2003 मध्ये संपादित केलेल्या जमिनींचे भाडे अद्याप मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी महापालिका प्रशासनाला जाब विचारला आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीत नवा पेच निर्माण झाला आहे.
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होत आहे. त्यासाठीची प्रशासकीय लगबग सुरू आहे. मात्र साधू आणि आखाड्यांमध्ये वेगळीच अस्वस्थता पसरली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे पुरोहितसंघाचे ध्वजारोहण तोंडावर आहे. या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेचे पदाधिकारी आणि विविध साधू शहरात दाखल होणार आहेत. मात्र कुंभमेळ्याच्या तयारीत वेगळीच समस्या उद्भवली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेने साधूग्राम उभारण्यासाठी सुमारे 1200 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये नाशिक शहर, आडगाव, नांदूर आणि आगर टाकळी शिवारातील सुमारे 1100 एकर, तसेच धार्मिक संस्थांच्या 100 एकर जमिनींचा समावेश आहे.
मात्र, यापूर्वीच्या कुंभमेळ्यात म्हणजेच 2003 मध्ये संपादित केलेल्या जमिनींचे भाडे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. या थकबाकीसाठी शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महापालिकेला सव्याज भरपाई देण्याच्या सूचना केल्याचे सांगितले आहे. आदेश मिळाल्यानंतरही पैसे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
अद्याप जुने कुंभमेळ्याचे पैसे मिळाले नसल्याने येत्या कुंभमेळ्यासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दाखवला आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात भाडेतत्त्वावर महापालिका बाराशे एकर जमीन घेणार आहे.
यासंदर्भात शेतकरी कृती समितीने तीव्र विरोध दर्शविला होता. महापालिका प्रशासनाची त्यामुळे कोंडी झाली. आयुक्त मनीषा खत्री यांनी याबाबत शेतकऱ्यांची चर्चा करू नये उपयोग झाला नव्हता. त्यामुळे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा केली. कुंभमेळा मंत्र्यांनी शेतकऱ्यांना तातडीने पैसे अदा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर काय कार्यवाही होते याची उत्सुकता आहे.
येत्या ३१ ऑक्टोबरला सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेचे पदाधिकारी आणि विविध आखाड्यांतील साधू नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. मात्र, साधूग्रामसाठी जमीन उपलब्ध होण्याचा प्रश्न कायम असल्याने साधू आणि आखाड्यांच्या प्रतिनिधींमध्ये अस्वस्थता आहे.
कुंभमेळ्याला अवघे सहा महिने उरले असताना साधूग्रामची उभारणी कधी आणि कशी होणार, अशी चिंता साधू आणि आखाड्यांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीत नवा पेच निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.