Maharashtra Temple Threat : त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगीसह अनेक देवस्थानांना धमकीचा ईमेल ; मंदिरांच्या सुरक्षेत वाढ, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

Trimbakeshwar and Saptashrungi Temples Threatening Email Received : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी देवस्थानांना धमकीचा मेल आला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून मंदिर परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Trimbakeshwar
TrimbakeshwarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Threatening Email Received by Trimbakeshwar and Saptashrungi Temples : ऐन दिवाळीच्या सणात राज्यातील काही प्रमुख देवस्थानांना नुकसान पोहोचविण्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी या दोन महत्वाच्या देवस्थानांना धमकीचा ईमेल प्राप्त झाला आहे. या ईमेलमध्ये मंदिरांना नुकसान पोहोचवण्याची गंभीर धमकी देण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर व सप्तशृंगी ही दोन्ही मंदिरे महाराष्ट्रातील प्रमुख आणि अत्यंत श्रद्धेची असल्याने येथे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे या घटनेला गांभीर्याने घेतले जात आहे.

या धमकीच्या ईमेलनंतर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंग गड, त्र्यंबकेश्वर मंदिर तसेच शहरातील काळाराम मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी हा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. नाशिकचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनीही धमकीच्या ई-मेलला दुजोरा दिला आहे.

मागच्या आठवड्यात नाशिकसह राज्यातील अनेक न्यायालयांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाले होते. त्यानंतर आता अज्ञात व्यक्तींनी प्रमुख देवस्थानांना लक्ष्य केल्याने पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त वाढविला आहे. त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी या दोन्ही देवस्थानांच्या परिसरासह संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. पोलीस दलाने संशयास्पद व्यक्ती किंवा हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Trimbakeshwar
Nashik Kumbh Mela : कुंभमेळा तोंडावर, नाशिक महापालिकेला उच्च न्यायालयाने फटकारलं! गोदावरी प्रदूषणावर संतप्त सवाल

विशेष करुन सप्तश्रृंग गड आणि त्र्यंबकेश्वर येथे अतिरिक्त ५० ते ६० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये शस्त्रधारी पोलिसांचाही समावेश आहे. दिवाळीच्या सुट्टयांमुळे या दोन्ही देवस्थानांसह काळाराम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

त्यामुळे मंदिर परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. देवस्थानांमधील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज वारंवार तपासले जात असून, परिसरातील संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीवरही पोलिस लक्ष्य ठेऊन आहेत.

Trimbakeshwar
Maharashtra ACB Bribery Cases : लाचखोरांवर ACB चा दणका, पण खात्यांची मेहेरबानी! 218 जणांना पकडूनही निलंबनाची कारवाई नाही

दरम्यान, धमकीच्या ई-मेलमधील नेमका मजकूर काय आणि तो कोणाच्या नावाने पाठविण्यात आला आहे. तसेच त्यामागील व्यक्ती कोण आहे, याबाबत पोलिसांनी गोपनीयता पाळली आहे. भाविकांनी घाबरून जाऊ नये, पोलिस प्रशासन सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, प्राप्त ई-मेलबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.