Tribal Politics: आदिवासी 'जेन झी' आंदोलनाने मंत्री सावध; मंत्री डॉ. अशोक उईकेंचा उलट प्रश्न, `माझाच राजीनामा का मागता`

Nashik Tribal Education Youth Movement Minister Dr. Ashok Uike Resignation Question-आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके पोहोचले थेट आंदोलकांच्या जिल्ह्यात, आंदोलकांनाच केला प्रतिप्रश्न
Dr-Ashok-Uike
Dr-Ashok-UikeDr-Ashok-Uike
Published on
Updated on

Dr Ashok Uike News: राज्य शासनाने आदिवासी आश्रम शाळा आणि शिक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाने तीव्र असंतोष पसरला आहे. राज्यभरातील युवक त्या विरोधात आंदोलन करीत आहेत. त्यांच्या प्रश्नांना राज्य शासन प्रतिसाद देत नसल्याचा संताप आहे. 

नाशिक जिल्ह्यात आदिवासी जेन झी सरकार विरोधात आंदोलन करीत आहेत. त्यांच्या प्रश्नांना शासनाकडून थेट बगल देण्याचा प्रयत्न होत आहे. या विषयावर सत्ताधारी आदिवासी आमदार आणि लोकप्रतिनिधींवर दबाव वाढत आहे. 

या आंदोलकांशी चर्चा करण्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके टाळत आहेत. यासंदर्भात आंदोलकांनी मंत्र्यांवर गंभीर आरोप केला होता. मंत्र्यांचा राजीनामा मागण्यात आला आहे. 

Dr-Ashok-Uike
Maharashtra Politics : मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी दबाव; विद्यार्थी आक्रमक, गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितले, 'मुख्यमंत्र्यांनी दखल...'

या प्रश्नावर आंदोलकांशी भेट टाळून मंत्री थेट आदिवासी आश्रम शाळांवर पोहोचले. यावेळी त्यांनी कर्मचारी आणि अन्य घटकांची समन्वय नसल्याने शिक्षणावर परिणाम होतो आहे. मात्र आंदोलन माझाच राजीनामा का मागतात? असा प्रश्न केला. 

Dr-Ashok-Uike
Tribal Students Protest : 13 दिवसांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबईत आंदोलनाचा इशारा

राज्यात आदिवासी विकास विभागाची ४९०  वसतीगृह आहेत. वसतीगृहातील सुविधांच्या प्रश्नांवर युवक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करीत आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा देण्याची जबाबदारी असलेल्या घटकांना प्रश्न केले जात नाहीत,  असा प्रति प्रश्न करून मंत्र्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

यावेळी त्यांनी काही आश्रम शाळांना भेटी दिल्या. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून सुविधांबाबत खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. आंदोलक आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांपासून दूर पळण्याचा आरोप मंत्र्यांवर होत आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी आंदोलकांना दुपारी पत्र देऊन सायंकाळी मुंबईला चर्चेसाठी निमंत्रित केले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री थेट नाशिकला पोहोचले. या राजकीय आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न त्यांनी या दौऱ्यातून केला. मात्र कामकाजातील अनेक त्रुटींवर उत्तरे देण्याचे टाळत समस्यांचा राजकीय चेंडू त्यांनी परतवण्याचा प्रयत्न केला. 

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com