Tribal Students Protest : 13 दिवसांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबईत आंदोलनाचा इशारा

13-day hunger strike suspended, but tribal students warn of Mumbai protest : नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर अन्नत्याग आंदोलन मागे; धरणे आंदोलन सुरूच राहणार, आदिवासी विकास मंत्र्यांच्या भूमिकेवर विद्यार्थ्यांचे गंभीर आरोप
Tribal Students Protest
Tribal Students ProtestSarkarnama
Published on
Updated on

Nashik tribal students agitation latest news : आदिवासी वस्तीगृहातील प्रश्नांसाठी राज्यातील विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू होता.

गेल्या 13 दिवसांपासून राज्यातील आदिवासी विद्यार्थी नाशिक आयुक्तालयाच्या विरोधात अन्नत्याग आंदोलन करीत होते. यावेळी राज्य शासनाला थेट आव्हान देण्यात आले होते. आदिवासी विकास मंत्र्यांचा राजीनामा मागण्यात आला होता.

तेरा दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या (MVA) विविध नेत्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र राज्य शासन त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नव्हते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अन्नत्याग आंदोलन थांबविण्यात आले.

विद्यार्थ्यांचे (Student) धरणे आंदोलन मात्र यापुढे सुरूच राहणार आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी या आंदोलकांना पाठिंबा दिला होता. यावेळी आंदोलकांशी झालेल्या चर्चेत पुढील दिशा काय असेल याचे संकेत दिले होते.

Tribal Students Protest
Maharashtra Belgium investment : बेल्जियमच्या कंपन्यांसाठी महाराष्ट्राने टाकले ‘रेड कार्पेट’; देवेंद्र फडणवीसांचे मोठे लक्ष्य

आता विद्यार्थ्यांनी राज्य शासनाच्या उपेक्षेला उत्तर देण्याची तयारी केली आहे. लवकरच मुंबईत आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची झालेल्या चर्चेत अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आले.

Tribal Students Protest
Pune Nashik Railway : पुणे-नाशिक रेल्वेवर सरकारला सत्यजीत तांबेंचा इशारा; ‘25 दिवस झाले, समितीला माहितीच नाही’

आंदोलन विद्यार्थी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या भूमिके विरोधात संतप्त आहेत. मंत्री जाणीवपूर्वक राजकीय संस्थाचालकांना आशीर्वाद देत असल्याचा आरोप करण्यात आला होता. आंदोलक विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने राजकीय नेते देखील संतप्त झाले होते. त्यामुळे आंदोलन आता कोणत्या वळणाला पोहोचते याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com