Nashik Unauthorized Schools : पालकांनो सावध! नाशिक जिल्ह्यातील 16 शाळा बेकायदा; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह

Nashik unauthorized schools : शासनाच्या परवानगीविना शाळा सुरु ठेवल्याचा ठपका ठेवत १६ शाळांना कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी पालकांना महत्वाचं आवाहन केलं आहे.
Nashik Unauthorized Schools
Nashik Unauthorized Schools Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकच्या शैक्षणिक वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या परवानगीविना तब्बल १६ शाळा सुरु आहेत. या १६ शाळांना प्राथमिक शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

शासनाच्या परवानगीविना शाळा सुरू ठेवत विद्यार्थ्यांसह पालकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. यातून विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालकांना खबरदारी म्हणून वेळीच काळजी घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांचे परवाने तपासले असता हा प्रकार समोर आला. नाशिक, देवळा, बागलाण आदी तालुक्यांमधे १६ शाळा अनधिकृत सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असून, या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यापूर्वीही नाशिक महापालिका हद्दित आठ शाळा अनधिकृत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

Nashik Unauthorized Schools
Nashik Politics : नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला चौथा बळी; उद्योजकाच्या मृत्यूनंतर ठाकरे-शिंदे दोन्ही शिवसेना आमने-सामने, नेमकं काय घडलं?

राज्य शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सुरू असलेल्या शाळांना आम्ही नोटीस बजावली आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांना परवानगी असलेल्या शाळेत स्थलांतरित करून आपल्या पाल्याचे भवितव्य सुरक्षित करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी केले आहे.

शासनाच्या नियमानुसार पहिली ते सातवी, पाचवी ते आठवी तसेच आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यापूर्वी शासनाची अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक आहे.

२०१९ पूर्वी शाळांना शिक्षण विभाग, शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि शिक्षण संचालक कार्यालयाकडून मान्यता दिली जात होती. मात्र, आता ही प्रक्रिया बदली असून थेट शासनाकडे ऑनलाइन प्रस्ताव सादर करावा लागतो. त्यांनी परवानगी दिल्यानंतर त्याची माहिती शिक्षण विभागाला दिली जाते.

ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही स्वरूपात प्रस्ताव दाखल करणे अत्यावश्‍यक आहे. त्याशिवाय शाळा सुरू ठेवण्याची परवानगी मिळत नाही.

Nashik Unauthorized Schools
Fake Teacher Appointment : शालार्थ घोटाळ्यानंतर महाराष्ट्रात नवा स्फोट; बनावट कागदपत्रांद्वारे शिक्षकाची नियुक्ती, 5 जणांवर गुन्हा

मात्र, नाशिक जिल्ह्यातील १६ शाळांनी ही प्रक्रिया पूर्ण न करताच शाळा सुरू ठेवल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश शासनमान्य शाळांमध्ये घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

अनधिकृत १६ शाळा पुढील प्रमाणे-

नाशिक : अभिनव बालविकास मंदिर मातोरी, चैतन्य टेक्नो स्कूल, चांदशी

बागलाण : ड्रिम्स इंटरनॅशनल स्कूल नामपूर, जिनियस किड्स ॲकॅडमी नामपूर, मलबेरी बुश इंटरनॅशनल स्कूल नामपूर, किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल नामपूर, होरायझन ॲकॅडमी, शेमळी

चांदवड : कंचनसुधा इंटरनॅशनल स्कूल, शिंगवे

देवळा : एव्हरग्रीन स्कूल ऑफ एक्सलन्स दहिवड, के. बी. इंग्लिश स्कूल खारीपाडा, अभिनव बालविकास मंदिर

निफाड : डी. व्ही. पी .मंडळ डे केअर सेंटर, नांदुर्डी

मालेगाव : मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल, टिंगरी

दिंडोरी : किड्स टाउना इंग्लिश मीडियम स्कूल, वलखेड फाटा, दिंडोरी, बालभारती पब्लिक स्कूल दिंडोरी (मराठी व इंग्रजी माध्यम)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com