Nashik ZP Elections : सुनेत्रा पवारांसमोर भाजपचं मोठं आव्हान; मिनी मंत्रालयात कोण मारणार बाजी?

Nashik Zilla Parishad Elections : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील १५ पैकी सात आमदार आहेत. हे सर्व सात आमदार सातत्याने निधीच्या मागणीसाठी झगडत असतात. मतदारसंघातील विकासकामे नेमकी कोणासाठी आणि कशी होतात, हे लपून राहिलेले नाही.
Nashik ZP Elections | Sunetra Pawar | BJP vs NCP
Nashik ZP Elections | Sunetra Pawar | BJP vs NCPSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik News, 30 Oct : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तीव्र संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. राज्यात नुकत्याच पाच विधान परिषद मतदारसंघांत निवडणुका झाल्या. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाला अंतर्गत विसंवादाचा मोठा फटका बसला. त्यामुळे पक्षाची पिछेहाट झाल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जाहीरपणे मान्य केले होते.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यासाठी मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेची निवडणूक ही महत्त्वाची परीक्षा असेल. बारामती मतदारसंघातील साखर कारखाने आणि अन्य निवडणुकांमध्ये त्यांनी पारंपरिक वर्चस्व कायम ठेवले. आता त्यांना पुणे जिल्ह्याबाहेर पडावे लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील १५ पैकी सात आमदार आहेत. हे सर्व सात आमदार सातत्याने निधीच्या मागणीसाठी झगडत असतात. मतदारसंघातील विकासकामे नेमकी कोणासाठी आणि कशी होतात, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे या आमदारांना आता मिळालेल्या निधीचे जिल्हा परिषद निवडणुकीतील यशात रूपांतर करून दाखवावे लागणार आहे.

Nashik ZP Elections | Sunetra Pawar | BJP vs NCP
Sanjay Gaikwad Suspension : एकनाथ शिंदेंकडून संजय गायकवाडांच्या निलंबनाचे आदेश? शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य अंगलट येण्याची शक्यता

जिल्ह्यात सात आमदार आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ, तसेच अन्न व नागरी पुरवठामंत्री नरहरी झिरवाळ असे दोन मंत्री आहेत. याशिवाय माणिकराव कोकाटे यांना न्यायालयीन प्रक्रियेमुळे मंत्रिपद सोडावे लागले होते. जिल्ह्यातील बहुतांश जागा या सात आमदारांच्या मतदारसंघांत आहेत.

Nashik ZP Elections | Sunetra Pawar | BJP vs NCP
Netanyahu election setback : निवडणुकीत नेतन्याहू यांना मोठा झटका, बहुमतापासून राहिले दूर; पंतप्रधानपद जाणार?

दुसरीकडे, पालकमंत्रीपदासह महापालिका आणि अन्य संस्थांवर भाजपने सत्तेच्या माध्यमातून आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गिरीश महाजन पालकमंत्री असल्याने त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावरील आपली पकड मजबूत केली आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपशी संघर्ष करणे अटळ आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससमोर मित्रपक्ष भाजपचेच मोठे आव्हान असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.