

Israel election results : इस्त्रायलच्या संसदीय निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान बेंझामीन नेतन्याहू यांना मोठा झटका बसला आहे. काही तासांपूर्वीच मतमोजणी पूर्ण झाली असून नेतन्याहू यांचा पक्ष बहुमतापासून दूर राहिला आहे. त्यांच्या पक्षाला केवळ ५३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. विरोधकांनाही बहुमताचा आकडा गाठता न आल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.
इस्त्रायलच्या संसदेत एकूण १२० सदस्य असून बहुमतासाठी ६१ हा जादूई आकडा आहे. मात्र, नेतन्याहू यांना आठ जागा कमी पडल्या आहेत. अन्य छोट्या पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा त्यांचा प्लॅनही विरोधी पक्षांकडून उधळून लावला जाऊ शकतो. त्यामुळे नेतन्याहू यांचे पद धोक्यात आले आहे.
प्रमुख विरोधी नेते असलेल्या गादी आयसेनकोट यांच्या आघाडीला केवळ ४८ जागा मिळाल्या आहेत. तर अरब पक्षांचे १९ उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे सत्तेच्या चाव्या या पक्षांकडे आहेत. सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी आघाडीला पाठिंब्यासाठी त्यांची मदत घ्यावी लागणार आहे. मात्र, अद्याप अरब पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्याने नेतन्याहू यांचे टेन्शन वाढले आहे.
मागील निवडणुकीतही नेतन्याहू यांच्या आघाडीला बहुमत नव्हते. मात्र, अन्य विरोधी पक्षांनाही कमी जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सरकार बनविण्याची संधी नेतन्याहू यांनाच होती. मात्र, यावेळचे चित्र वेगळे असून प्रमुख विरोधी पक्षानेही जोरदार लढत देत ४८ जागा जिंकल्या आहेत. त्यांना बहुमतासाठी आणखी १३ सदस्यांचा पाठिंबा हवा आहे.
अरब पक्षांना आतापर्यंतच्या सर्वाधिक जागा मिळाल्याचे सांगितले जाते. मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यात यावेळी दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांचे महत्व वाढले आहे. नेतन्याहू यांच्या आघाडीकडे मागील निवडणुकीत एकूण ६८ एवढे बहुमत होते. अरब पक्षांचा पाठिंबा मिळाल्याशिवाय हा आकडा गाठता येणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.