

Nashik ZP News : सिमेंट बंधारा दुरुस्ती कामांचे देयक मंजूर करण्यासाठी 72 हजार रुपयांची मागणी करीत तडजोडीअंती 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक जिल्हापरिषदेतील जलसंधारण अधिकारी वैशाली ठाकरे यांच्यासह सहायक लेखाधिकारी अरुण धारणकर यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले होते. 18 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
त्यावेळी प्रशासनाने कोणकोणती कामे प्रलंबित आहे याची चौकशी करताना लाचखोर जिल्हा जलसंधारण अधिकारी वैशाली ठाकरे यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली असता तब्बल १०० फाईल्स त्यांनी आपल्या कपाटात लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणाचा अहवाल जिल्हा परिषदेने शासनाला कठोर शब्दात सादर केल्याने त्यांच्याविरोधात आता कारवाईची टांगती तलवार आहे.
एका कंत्राटदाराकडून पाटबंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाचे 16 लाखांचे बिल काढून देण्यासाठी दोघांनी 72 हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून दोघांनाही जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत रंगेहात पकडले होते.
या कारवाईनंतर जिल्हा परिषदेने त्यांच्या कामकाजाची चौकशी केली होती. जलयुक्त शिवारच्या 58 कामांच्या निविदेत त्यांनी घोळ केला होता. त्यामुळे सीईओ ओमकार पवार यांनी ही निविदा प्रक्रिया रद्द करत त्यांना नोटीस बजावली होती. या प्रकरणी आता जिल्हा परिषदेने त्यांच्या कामकाजाची चौकशी करून आपला अहवाल तयार केला आहे.
यंत्रणेकडून त्यांच्या कामकाजाची तपासणी केली असता ठाकरे यांनी आपल्या कपाटात फायली लपविल्याचे निदर्शनास आले. मनमानी पद्धतीने कामकाज करत असल्याचे विभागातील कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात आल्याचे समजते. या चौकशीचा अहवाल तपासणी यंत्रणेने मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना सादर केला असून, त्यांनी तो शासनाला सादर केला आहे. त्यामुळे निलंबित लाचखोर अधिकारी वैशाली ठाकरे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान लाचखोरीच्या एकापाठोपाठ घडलेल्या तीन घटनांनी नाशिक जिल्हापरिषदेची प्रतिमा मलिन झाली असून सीईओ ओमकार पवार हे अॅक्शन मोडवर आलेले आहेत. नाशिक जिल्हापरिषदेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी आता कठोर पावले उचलली असून काही महत्वाचे निर्णय देखील घेतले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.