Sushma Andhare Vs Kapil Patil News : 'गर्दी जमत नाही म्हणून त्यांनी..' ; सुषमा अंधारेंनी कपिल पाटलांना लगावला टोला!

Sushma Andhare and Lokabha Election News : 'गौतमी पाटीलने गाणं म्हणायचं पाटलाचा बैलगाडा आणि शिंदे फडणवीसांनी महाराष्ट्रात सुरु केला राडा' असंही अंधारे म्हणाल्या आहेत.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Bhiwandi Lok Sabha Constituency News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या भिवंडी लोकसभा मतदारसंघात आल्या होत्या, त्यांनी मंगळवारी भाषणातून खासदार कपिल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांच्यावरही शाब्दिक हल्ला केला आहे.

सुषमा अंधारे(Sushma Andhare) म्हणाल्या, 'गर्दी जमत नाही म्हणून त्यांनी वेगळा फंडा वापरला आहे. कपिल पाटील यांना गर्दी जमवण्यासाठी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवावा लागतो. गौतमी पाटीलने गाणं म्हणायचं पाटलाचा बैलगाडा आणि शिंदे फडणवीसांनी महाराष्ट्रात सुरु केला राडा. सगळ्या राजकारणाचा चिखल करुन टाकला आहे.”

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sushma Andhare
Loksabha Election 2024 : शिंदे-फडणवीस-अजित पवारांसाठी 'या' सर्व्हेने दिली 'GOOD NEWS'

कल्याण लोकसभेत ठाकरे गटाकडून अंधारे यांचे नाव चर्चेत आहे याविषयी त्या म्हणाल्या, 'माझं नाव चर्चेत पण मला अधिकृत निरोप नाही. मला फक्त काम करायचे आहे. मुक्त संवाद अभियानाच्या माध्यमातून मी या मार्गाने आले आहे. माझ्या पक्षाने मला सांगितले तर मी वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेल. तुम्हाला असे का वाटते की श्रीकांत शिंदे म्हणजे फारच मोठा अडचणींचा डोंगर आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तो अडचणींचा डोंगर आहे. परंतू आम्हाला ते फार मोठे आव्हान वाटत नाही.'

याशिवाय 'कल्याण मधील वाढती गुन्हेगारी, अस्वस्थता, ठेकेदार, पोलिस यंत्रणा दहशतीखाली आहे. येथे सत्ताधाऱ्यांमधील गॅंगवॉर शिगेला पोहोचला आहे. तर मला असे निश्चित वाटते की येणारी निवडणूक ही श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांच्यासाठी इतकी सोपी असणार नाही. जितकी सोपी त्यांना मुख्यमंत्री पुत्र म्हणून वाटत आहे.

' कारण मुख्यमंत्री स्वतःच प्रोजक्शन कितीही शेतकरी पुत्र म्हणून करत असले, तरी श्रीकांत यांचे प्रोजेक्शन ते शेतकरी पुत्र म्हणून करु शकणार नाहीत. श्रीकांत शिंदे हे एका अत्यंत गर्भश्रीमंत आणि पक्ष फोडण्यात तरबेज असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Sushma Andhare
Shivsena UBT News : शिंदे, पवार गटाच्या नेत्यांना कमळावर लढावे लागणार : सचिन अहिरांनी सांगितली आतली गोष्ट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com