Ajit Pawar: भुजबळांच्या दाव्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया ; 'हा तर नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न...'

ED Action on Chhagan Bhujbal claim Ajit Pawar Reaction: निवडणुका जवळ येत आहेत तशा महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून नवीन नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न सुरू आहे.वास्तविक हा निवडणुकीचा मुद्दा नाही आणि भुजबळ तसे बोलले देखील नाही.
Ajit Pawar & Chhagan Bhujbal
Ajit Pawar & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Pune News : 'द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया' या राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ईडीपासून सुटका व्हावी, यासाठी आपण भाजपसोबत गेलो," असं छगन भुजबळ यांनी सांगितल्याचा दावा सरदेसाई यांनी पुस्तकात केला आहे. हा दावा भुजबळांनी खोडून काढला आहे. त्यानंतर आता अजित पवारांकडून त्याबाबत पहिली प्रतिक्रिया आली आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, "छगन भुजबळांनी त्याचे खंडण केले आहे. ते वकिलांमार्फत कारवाई देखील करणार आहेत . भुजबळांनी सांगितलं आहे की मी अशी मुलाखत दिली नाही. निवडणुका जवळ येत आहेत तशा महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून नवीन नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न सुरू आहे.वास्तविक हा निवडणुकीचा मुद्दा नाही आणि भुजबळ तसे बोलले देखील नाही. मात्र सध्या महाराष्ट्र पुढील 5 वर्षात कोणाच्या हाती द्यायचा आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

Ajit Pawar & Chhagan Bhujbal
PM Modi Speech Dhule: महाविकास आघाडीमध्ये ड्रायव्हरसीटसाठी स्पर्धा सुरु; मोदींचा धुळ्यात हल्लाबोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे तो कटेंगे याच आशयाचं ट्विट केले आहे. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, भाजपासोबत आम्ही महायुतीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रॅम अंतर्गत आहोत. त्यांची विचारधारा वेगळी आहे. मात्र आम्ही शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही. यापूर्वी आमची विचारधारा वेगळ्या असताना देखील अडीच वर्ष आम्ही आधी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर सरकार चालवले आहे. राज्याचा विकास व्हावा, यासाठी आम्ही महायुती सरकारमध्ये सामील झालो आहोत.

Ajit Pawar & Chhagan Bhujbal
Sharad Pawar: पुत्राच्या विजयासाठी माजी आमदारानं सोडली शरद पवारांची साथ! भाजपचा प्रचार करणार

"अडीच वर्ष सेनेबरोबर काढली ना? तुम्ही एक अवाक्षर तुम्ही मला विचारलं नाही. काँग्रेस, सेनेचे विचारधारा एक नव्हती मात्र येथील स्थानिक काँग्रेसचे आमदारांना सरकारमध्ये जायचंय का विचारला असता 90 टक्के आमदारांनी होकार दर्शवला. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत आल्याचे देखील पाहिलं" असे अजित पवार म्हणाले.

अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांनी घरी बोलावून त्यांच्यावरील कारवाईची फाईल दाखवली. फडणवीसांनी गोपनियतेचा भंग करुन दबाव आणला या सुप्रिया सुळेंनी केलेल्या आरोपांवर अजित पवारांनी ही माहिती कोणीही माहितीच्या अधिकारात मागवू शकतो, असे उत्तर दिलंय. सुनिल तटकरे यांनी शरद पवारांनी भेटायला बोलावून फसवणूक केली या आरोपांवर ते त्यांनाच विचारा, असे म्हणत बोलण्यास नकार दिला .

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com