MLA Nilesh Lanke: आमदार लंकेंनी शरद पवार गटाची वाट धरली? महाविकास आघाडीच्या बैठकीला लावली हजेरी

Nagar South Lok Sabha Constituency : नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने कंबर कसली आहे.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi in Ahmednagar : नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने कंबर कसली आहे. नगर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून शरद पवारांची भेट घेतलेले आमदार नीलेश लंके देखील उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांना टाळण्यासाठी आमदार लंके(Nilesh Lanke) भवनातील वेगळ्याच मार्गाने बाहेर पडले. आमदार लंके यांचा हा चकवा बैठकीला उपस्थित असलेल्या आघाडीतील घटक पक्षांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संभ्रम निर्माण करणारा ठरला. मात्र, आमदार लंकेंची आघाडीच्या बैठकीला उपस्थिती महायुतीचा सदस्य नसल्याचा संदेश देण्यासाठी पुरेशी ठरली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilesh Lanke
MNS News: भाजप उमेदवारावर वक्तव्य करणं भोवलं, मनसे पदाधिकाऱ्यावर मोठी कारवाई

महाविकास आघाडीत एकत्रित काम करायचे आहे. दोन्ही जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करावी लागणार आहे. प्रत्येकी पक्षाचे दोन पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश करून घेण्यात येतील. यातून निवडणुकीमध्ये एकत्रितपणे काम करण्यासाठी समन्वय साधला जाईल. अशाच प्रकारची तालुकास्तरीय समिती स्थापन करून महाविकास आघाडीचे मेळावे, सभा, रॅलीचे आयोजन करून एकत्रित काम करण्याच्या सूचना राजेंद्र फाळके यांनी मांडली.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षासह शिवसेना(Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काॅंग्रेस आणि महाविकास विकास आघाडीतील इतर घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पाच तास चाललेल्या बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी भावना व्यक्त केल्या. वेळ जास्त वाटत असला, तरी तो खूप कमी आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महाविकास आघाडीला रात्रीचा दिवस करावा लागणार आहे. धनशक्ती विरोधात मोठी आहे. तिला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीतील समन्वय गरजेचा आहे, असा सर्वच पदाधिकाऱ्यांच्या भाषणातील सूर होता.

काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, रावसाहेब खेवरे, आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, वकील प्रतापराव ढाकणे, काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आदी उपस्थित होते.

Nilesh Lanke
Ahmednagar Loksabha News : 'सागर' बंगल्यावरच विखेंशी चर्चा करणार; आमदार शिंदेंचे सूचक विधान

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अजित पवार(Ajit Pawar) गटाचा साथ सोडण्यापूर्वी अजितदादांची भेट घेऊन शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आमदार नीलेश लंके यावेळी बैठकीला उपस्थित होते.

आमदार लंके यांनी देखील बैठकीला हजेरी लावून महायुतीत आपण सदस्य राहिलो नसल्याचे दाखवून दिले. परंतु महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये किती समन्वय आहे, याची देखील आमदार लंकेंनी अप्रत्यक्षरित्या चाचपणी केली.

NCP Office
NCP OfficeSarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेस भावनाचे नेहमी बंद असलेले दार आमदार नीलेश लंके यांना बाहेर जाण्यासाठी आज खुले करण्यात आलं होतं, अशी चर्चा आहे.

आमदार लंके बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळाने पोहोचले. त्यानंतर बैठक ताणली गेली आणि तब्बल पाच तास बैठक चालली. ही बैठक संपल्यानंतर आमदार लंके भवनातील मुख्य प्रवेशद्वारे बाहेर पडतील, असे भासवले गेले. परंतु ते भवनातील वेगळ्या मार्गाने बाहेर पडून माध्यमांना चकवा दिला. आमदार लंके भवनाबाहेर पडताच, त्यांनी मुख्य प्रवेशद्वारावर उभे केलेले वाहन चालकाला घेऊन येण्याचा निरोप दिला. मुख्य प्रवेशद्वारासमोरील आमदार लंकेंचे वाहन चालकाने पळवल्यानंतर माध्यम प्रतिनिधींना आमदार लंके हे भवनाबाहेर पडल्याची माहिती दिली. तोपर्यंत आमदार लंके दुसऱ्या वाहनात बसून राष्ट्रवादी भवन परिसर सोडून निघून गेले होते.

आमदार लंके महायुतीत की आघाडीत? -

भाजपचे आमदार राम शिंदे यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार नीलेश लंके महायुतीचे सदस्य असल्याचा दावा केला होता. परंतु आमदार लंके यांनी शनिवारी महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे त्यांचे महायुतीत स्थान राहिले की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com