Karjat municipality controversy : अपमान की सुडाचे राजकारण? अजितदादांचे फलक हटवताच, राम शिंदेंविरोधात आगडोंब, ‘कर्जत बीड नाही’ असा इशारा

NCP Protest in Karjat After Ajit Pawar Tribute Banners Removed; Ram Shinde Targeted : कर्जत नगरपालिकेने अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचे फलक काढण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले.
Karjat municipality controversy
Karjat municipality controversySarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar tribute banner row : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचे फलक हटवण्यामागे राजकीय सूडबुद्धीचं राजकारणच होतं, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात करत, नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात बडतर्फीची कारवाईची मागणी करण्यात आली.

अजित पवार यांचे श्रद्धांजलीचे फलक काढण्यावरून, कर्जत इथं सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनात, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या भाषणात, भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवला.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कर्जत शहरात लागलेले श्रद्धांजलीचे फलक कर्जत नगरपालिकेने हटविले. सदरचे फलक नुसतेच हटविले नसून, ज्यापद्धतीने काढले, त्यात फलकावरील अजित पवार यांच्या छायाचित्राची देखील विटंबना झाली. नगरपालिका प्रशासनाच्या या कारभाराचे आज कर्जतसह राज्यात पडसाद उमटत आहे. कर्जतमध्ये या प्रशासनाच्या कृतीचा निषेध नोंदवण्यात आला. सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलना करण्यात आलं. यात सभापती प्रा. राम शिंदे यांच्यावर देखील आगपाखड करण्यात आली.

जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब साळुंके, अंबादास पिसाळ, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक रावसाहेब धांडे, राष्ट्रवादीचे (NCP) तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, प्रा. विशाल मेहेत्रे, राहुल नवले, धनंजय राणे, सोमनाथ भैलुमे, चंदनसिंग परदेशी, नामदेव थोरात यांच्यासह आदींनी वादग्रस्त मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र भावना व्यक्त करीत त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली.

Karjat municipality controversy
Beed Walmik Karad Supporter Call : "जरांगेंना संपवू" कटाचा आवाज बाहेर! कराड समर्थकाचं कॉल रेकॉर्डिंग लिक; राज्यात राजकीय भूकंप (Video)

वास्तविक पाहता आजमितीस त्यांनी लोकहिताचे कामे न करता त्यांना जे कामे समाज भावनेचे विरोधातील आहे ते काम करण्यात मुख्याधिकारी अधिक धन्यता मानतात. कालच्या घटनेत नुसतेच फलक काढण्यात आले नाहीतर त्या फलकाची आणि त्यावरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोची विटंबना केली आहे. ज्या इमारतीमध्ये ते बसतात त्या इमारतीस निधी देणारे अजित पवार आहेत. किमान याची तरी लाज त्यांनी फलक काढताना बाळगायला हवी होती, असा घणाघात आंदोलकांनी केला. प्रांताधिकारी पाटील यांनी या प्रकाराची निःपक्षपाती चौकशी करून, जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर अहवाल पाठवला जाईल, असे आश्वासन आंदोलकांना दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Karjat municipality controversy
Nitesh Rane Fund Controversy : राणेंचं मंत्रिपद धोक्यात? राज्यपाल कारवाई करणार? ठाकरेंच्या शिलेदारानं 'पिच्छा' पुरवण्याचं ठरवलं

गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही

माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी, मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांची कार्यपद्धती वादग्रस्तच असून, ते कायम शहराच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात काम करतात. अजितदादांच्या निधनानंतर अख्खा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. श्रद्धांजली वाहत आहे. असे असताना त्यांच्या श्रद्धांजलीचे फलक फक्त कर्जतमध्येच का काढण्यात आले? प्रशासनाच्या या निर्णयामागे आणखी कोण आहे का? याचा देखील शोध घ्यावा, अश मागणी केली. कर्जत नगरपालिकेच्या इमारातीला अजितदादांनी निधी दिला आहे. त्या इमारतीस अजित पवार भवन, असे नाव देऊ. यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाली तरी चालेले. सूडबुद्धीच्या राजकारणास भविष्यात जसेच्या तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला.

बीडची घाण कर्जतमध्ये...

'मुख्याधिकारी जायभाये यांना श्रद्धांजली फलक दोन-चार दिवस काढू नका, अशी विनंती केली. त्यावर, आम्हालावरून आदेश आहे, असे म्हणाले. हे आदेश कोणाचे आहेत, तर नगराध्यक्ष किंवा राम शिंदे यांचा. राम शिंदेंनी आमच्या जनतेच्या उरावर बसवण्यासाठी आणलं का? असा माणूस असतो का? एवढा नालायक माणूस हा, बीड जिल्ह्यातून आलेला. तिथली घाण इकडे आणतो का? इथं चाललेले एकोप्याचं वातावरण खराब करतो का? आमचं प्रशासनाला नेहमीच सहकार्य असतं, पण आज घडलेली घटना ही गंभीर आहे. राज्याचा नेता, अजितदादा सारखा नेता, महायुतीत काम करणारा नेता आणि त्यांचे फलक काढायला लावता! याचा मी निषेध करतो,' असे घणाघात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केला.

सस्पेंडचा सपाटा...

'सहा महिन्यापूर्वी तुम्ही खोटी माहिती देऊन बांधकाम विभागाचा अधिकारी सस्पेंड केला. दोन पोलिस अधिकारी सलामी द्यायला आले नाही, त्यांना सस्पेंड केलं. चांगला काम करणाऱ्या प्रांताधिकारी आणि तहसीलदाराला सस्पेंड केलं. सस्पेंड करायचं काय काम होतं? चांगले काम करत होते, त्यांच्या क्षुल्लक चुका होत्या. आज तुम्ही अजितदादा सारख्या महान नेत्याचे श्रद्धांजलीचे फलक काढले, तुमच्याविरुद्ध जामखेडचा एक कार्यकर्ता बोलला, तर तुम्ही हक्कभंग केला, आणि दुसरीकडे तुमच्या सरकारमध्ये काम करणाऱ्या महायुतीमधील अजित दादांच्या मृत्यूचे श्रद्धांजलीचे फलक काढायला सांगता, याचा निषेधच करतो,' असेही बाळासाहेब शिंदे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com