Nida Khan divorce case : टीसीएस प्रकरणातील गरोदर निदा खानच्या वैवाहिक वादाला न्यायालयीन वळण; पती घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम

Moin han remains firm divorce decision after counselling Nashik Family Court; next hearing November 20 : नाशिकच्या कौटुंबिक न्यायालयात पती-पत्नीचे समुपदेशन; मोईन नाविद खान यांच्या घटस्फोट अर्जावर पुढील सुनावणी 20 नोव्हेंबरला.
Nida Khan
Nida KhanSarkarnama
Published on: 
Updated on: 

TCS Nashik case accused divorce hearing : राज्यभर चर्चेत असलेल्या टीसीएस प्रकरणातील संशयित निदा खान हिच्या वैवाहिक वादाला आता न्यायालयीन वळण मिळाले आहे. निदा खान हिचा पती मोईन नाविद खान याने घटस्फोटासाठी नाशिक रोड येथील कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

या अर्जावर शुक्रवारी (16 ऑक्टोबर) पहिल्या सुनावणीच्या निमित्ताने दोघांचे समुपदेशन करण्यात आले. मात्र, समुपदेशनानंतरही मोईन खान घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

निदा खान हिचे नाव नाशिकच्या (Nashik) टीसीएसमधील कथित धर्मांतर प्रकरणात संशयित म्हणून समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर तिच्या वैवाहिक आयुष्यातील वादही न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. मोईन खान याने दाखल केलेल्या घटस्फोट अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयाच्या सूचनेनुसार शुक्रवारी दोघांचे समुपदेशन पार पडले. या वेळी पती-पत्नी दोघेही उपस्थित होते.

समुपदेशनादरम्यान मोईन खान याने घटस्फोट घेण्याच्या निर्णयामागील भूमिका मांडली. या प्रकरणामुळे कुटुंबाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला असून, मानसिक त्रासासह समाजात वावरताना अडचणी निर्माण झाल्याचे त्याने न्यायालयात (Court) सांगितल्याची माहिती आहे.

Nida Khan
Sangli DCC Bank Election : ‘बँकेचे नुकसान करणाऱ्या दरोडेखोरांचा बंदोबस्त करू’; पडळकरांचा अर्ज वैध होताच सदाभाऊ खोतांची डरकाळी

पहिल्या समुपदेशनानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंना निर्णयाबाबत विचार करण्यासाठी वेळ दिला आहे. मात्र, मोईन खान याने घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

Nida Khan
Starlink India launch : भारतात स्टारलिंक सुरू होण्यास उशीर का? मस्क यांच्या टीकेनंतर रिलायन्सने काय सांगितले?

या प्रकरणात अर्जदार मोईन खान यांच्यातर्फे ॲड. नितीन पंडित, तर प्रतिवादी निदा खान हिच्यातर्फे ॲड. शोभा ताजनपुरे बाजू मांडत आहेत. पुढील सुनावणीत न्यायालयात काय घडते आणि घटस्फोट अर्जाबाबत कोणती दिशा स्पष्ट होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com