Sangamner Farmers Protest : संगमनेरात शेतकरी आक्रमक; प्रांताधिकारी कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेक

Farmers protest over power and water issues in Sangamner : वीज-पाणी प्रश्नावर बाळासाहेब थोरात, जयश्री थोरात यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा; प्रांताधिकारी कार्यालयात नसल्याने शेतकऱ्यांचा संताप
Sangamner Farmers Protest
Sangamner Farmers ProtestSarkarnama
Published on
Updated on

Sangamner electricity issue : काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांची कन्या जयाश्री थोरात यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा निघालेल्या मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर आल्यावर चांगलाच आक्रमक झाला.

प्रांताधिकारी अरुण उंडे कार्यालयात नसल्याने, थोरात बापलेकीनं कार्यालयासमोर बसून घेतले, तर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयात घुसून, प्रांताधिकारी यांच्या खुर्चींची फेकाफेकी केली. यामुळे आक्रमक मोर्चामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

संगमनेर (Sangamner) तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा झाला आहे. धरणांना पाणी असून देखील शेतकऱ्यांच्या पिकांची पाण्याअभावी नासाडी होऊ लागली आहे. यावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. प्रांताधिकारी कार्यालयात नसल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले अन् कार्यालयात घुसले.

काही शेतकऱ्यांना (Farmer) थेट प्रांताधिकारी यांची टेबलसमोरील खुर्ची उचलून ती दालनात फेकून दिली. यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचे देखील संतप्त शेतकऱ्यांसमोर काही चालले नाही.

Sangamner Farmers Protest
Pravin Swami soybean incident : दुष्काळाच्या मागणीवर शेतकरी आक्रमक; आमदार प्रवीण स्वामींवर सोयाबीन फेकले

तत्पूर्वी नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांची कन्या जयश्री थोरात यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर बसून घेतले. माजी आमदार सुधीर तांबे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

Sangamner Farmers Protest
Kaju Badam Controversy : काजू-बदाम देतो, पण आमच्या बांधावर या! बुलढाण्यातील शेतकऱ्यांची मंत्र्यांना थेट हाक

बाळासाहेब थोरात म्हणाले, "महाराष्ट्रातच दुष्काळी स्थिती आहे. खरीप शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. 1972 पेक्षा मोठा दुष्काळ आहे, हे लक्षात येथे घेतले पाहिजे. शेतकरी आणि शेजमजूर यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. त्याला रोजंदारी दिली पाहिजे. त्याला काय नाव द्यायचे ते द्या."

'आमच्याकडे पाणी आहे, तर ते उचलण्यासाठी वीज नाही. शेतातील पिके जळून चालली आहे. पाणी वाहून चालले आहे. ते कुठे चालले आहे ते माहिती नाही. पाणी उचलायला परवानगी आहे. त्याचबरोबर वीज देखील नाही. महाराष्ट्र हवालदिल आहे. सरकारला आणि इथल्या लोकप्रतिनिधीला मोठ-मोठाले जाहिरातबाजी करणारे फलक लावण्यात बिझी आहेत,' असा टोला थोरातांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com