Nilesh Lanke
Nilesh Lankesarkarnama

Nilesh Lanke News : वकील आढाव दाम्पत्याच्या हत्येतील आरोपींचा पोलिसांना दम, आमदार लंकेंचा गौप्यस्फोट

Advocate Couple Murder : पारनेरमधील घटना ही अतिशय निंदनीय आहे. गोळीबार घडवून आणणारा मास्टरमाइंड कोण? याचा शोध घ्यावा, अशी मागणी पोलिस अधीक्षक आणि पारनेर पोलिसांकडे केलेली आहे.
Published on

Nagar Political News : राहुरी तालुक्यातील वकील दाम्पत्य राजाराम आढाव आणि मनीषा आढाव यांचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपींना अटकदेखील केली. मात्र, हे आरोपीच पोलिसांना दम देत असल्याचा गौप्यस्फोट आमदार नीलेश लंके यांनी केला. (Nilesh Lanke News)

Nilesh Lanke
Milind Deora : काँग्रेस सोडण्यामागं नेमकं कारण काय? मिलिंद देवरा म्हणाले, "तो एक..."

राहुरीतील वकील आढाव दाम्पत्याच्या हत्येत अटक असलेले आरोपी निर्ढावलेले आहेत. आम्हाला मारहाण केल्यास आम्ही तुमची न्यायालयाकडे तक्रार करू, असा दम त्यांनी पोलिसांना दिला होता, असे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. राज्यासह नगर जिल्ह्यामध्ये वाढलेल्या गुन्हेगारीवर तसेच पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला. यावर आमदार लंके यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पारनेरमधील घटना ही अतिशय निंदनीय आहे. गोळीबार घडवून आणणारा मास्टरमाइंड कोण? याचा शोध घ्यावा, अशी मागणी पोलिस अधीक्षक आणि पारनेर पोलिसांकडे केलेली आहे. ही अपप्रवृत्ती आहे तिचा शोध पोलिसांना (Police) घ्यावाच लागणार आहे. आम्ही सुपा एमआयडीसीमधील गुंडगिरी आणि दहशतगिरी मोडून काढली. त्यामुळे एमआयडीसीचा विस्तार झाला. आता पुन्हा गुंडगिरी आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार लंके यांनी दिला.

राज्यात गृह विभागाचे काम चांगले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेदेखील चांगले काम करत आहेत. परंतु कुठेतरी पोलिस प्रशासनाला कमी मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे त्यांनाही दोष देणे चुकीचे ठरते. पोलिसांना काम करायचे म्हटल्यास कायदाच आडवा येतो. त्यामुळे खाकी वर्दीचा धाक दाखवल्यास न्यायालयात पोलिसांविरुद्ध तक्रारी होतात. तिथेच कुठेतरी गुंडगिरी बेलगाम झाल्याचे दिसते, असे सांगत राहुरी येथील वकील आढाव दाम्पत्याच्या हत्येच्या गुन्हेगारांचा निर्ढावलेपणा आमदार लंके यांनी सांगितला.

मी छोटा कार्यकर्ता

"मी पारनेर विधानसभा मतदारसंघाचा आमदार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच सर्वसामान्य लोकांबरोबर आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातून माझ्याकडे कोण ना कोणतरी कामानिमित्त येत असते. प्रत्येकाचे काम करून देण्याचा माझा प्रयत्न असतो. नगरविषयी तिथले लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन सक्षम आहे. नगर जिल्हा हा विकासाच्या वाटेवर आहे. विकास ही हनुमानाची शेपूट आहे. ती कधीच पूर्ण होत नाही. नगर जिल्ह्यात प्रस्थापित साखर, शैक्षणिक सम्राट आहेत. मी छोटा कार्यकर्ता आहे. माझ्याकडून सर्वसामान्य अपेक्षा करतात हेच माझ्यासाठी मोठेपण आहे, असे आमदार लंके म्हणाले.

(Edited By Roshan More)

R

Nilesh Lanke
Loksabha Election 2024 : 'छोट्या पहिलवानाने अस्मान दाखवलं,' धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींना डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com