Nilesh Lanke News : नीलेश लंकेंनी सांगितलं आपल्या विजयातील 'किंगमेकर'चं नाव; फेटाही बांधला

Ahmednagar South Lok Sabha Election Nilesh Lanke Reveled Kingmaker : एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे पाहिले जाते.त्यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नीलेश लंकेंना थोरातांची मोठी मदत झाल्याचे बोलले जात होते.
Ahmednagar Lok Sabha Election 2024
Ahmednagar Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुजय विखेंना दारुण पराभवाचा धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके हे जायंट किलर ठरले.लंकेंच्या या विजयाची राज्यभर चर्चा झाली.इतकंच नव्हे तर लंकेंच्या विजयाने नगरमधील भाजप आणि विखे कुटुंबाच्या राजकारणाला सुरुंग लावत राजकीय गणितं बदलवली आहे. पण सुजय विखेंच्या रूपाने तगडा उमेदवार मैदानात असताना लंकेंना विजयापर्यंत नेमकं कोणी पोहचवलं याचा उलगडा स्वत:त्यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीतील विजयांनंतर नीलेश लंके (Nilesh Lanke) आणि माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मंगळवारी (ता. 18) पहिल्यांदाच भेट झाली. थोरात यांच्याकडून नवनिर्वाचित खासदार नीलेश लंकेंचा संगमनेर येथे जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी लंकेंनी तुफान फटकेबाजी करत अनेक धक्कादायक खुलासेही केले.लंकेंचा विजय आणि विखेंचा पराभव असा दुहेरी योग साधल्याने थोरातांचा आनंद लपून राहणारा नव्हता.

या सत्कार सोहळ्यात विशेष म्हणजे खासदार निलेश लंकेंनी घेतलेल्या भूमिकेची चर्चा झाली. माझ्या निवडणुकीत कृष्णाची भूमिका ज्यांनी बजावली त्यांना आधी फेटा बांधा,नंतर मला असा हट्ट त्यांनी लावून धरला. अखेर बाळासाहेब थोरात यांच्या डोक्यावर फेटा बांधला अन् त्यानंतरच स्वत:च्या डोक्यावर फेटा बांधून घेतला. लंकेंनी निवडणुकीतील विजयानंतरही कायम ठेवला होता.

एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे पाहिले जाते.त्यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंकेंना थोरातांची मोठी मदत झाल्याचे बोलले जात होते.

Ahmednagar Lok Sabha Election 2024
अजितदादा- तटकरेंची मस्करी ; भुजबळांनी तक्रार करत शायरीच बोलून दाखवली | Chhagan Bhujbal on Ajit Pawar

निलेश लंकेंनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांवर कौतुकाचा वर्षाव केला.ते म्हणाले, माझ्या मतदारसंघात बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांची यंत्रणा काम करत होती.त्यांनी माझ्यासाठी काय काय काम केलं,हे मला निकालानंतर सगळं मला माहिती झालं. मी विजयी झालो, त्यावेळी बाळासाहेब थोरात आजारी होते.त्यांना खूप आग्रह केला मात्र ते येऊ शकले नाहीत असेही त्यांनी सांगितले.

तसेच ज्या माणसाने आपल्याला दिल्ली दाखवली त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी संगमनेरमध्ये आलो आहे. किंग होणं सोपं असतं, मात्र किंगमेकर होणं अवघड, अशा भावना व्यक्त करतानाच त्यांनी नगरमधील विजयातील बाळासाहेब थोरातांचा रोल स्पष्ट केला.

कौरव पांडवांच्या युद्धात पांडवांचा विजय श्रीकृष्णामुळे झाला.माझ्या निवडणुकीत श्रीकृष्णाची भूमिका पार पाडली ते एकमेव बाळासाहेब थोरात ते आहेत. त्यामुळे मला आज माझ्या विजयाचा खरा आनंद मिळाला.यावेळी त्यांनी विजयानंतर मी आजपर्यंत कोणालाही फेटा बांधू दिला नाही.मी सुध्दा यांच्यापेक्षा दहा पट हट्टी असल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Ahmednagar Lok Sabha Election 2024
Devendra Fadnavis on Mission Nagpur : ‘मिशन नागपूर’साठी देवेंद्र फडणवीसांकडून हालचालींना वेग ; मुंबईत विशेष बैठक!

माझ्या निवडणुकीचा रिमोट बाळासाहेब थोरात यांच्याकडे होता. विरोधकांकडे सीसीटीव्ही कॅमेरा तर माझ्याकडे ड्रोन कॅमेरा होता. हे सगळं सुरू असताना मला वाटायचं मी हुशार आहेत, मात्र, थोरातसाहेबांची यंत्रणा पाहिल्यावर मला माझी लायकी समजली. थोरात यांना धन्यवाद नव्हे तर सॅल्यूट करतो असेही लंके म्हणाले.

गजा मारणेच्या भेटीवर भाष्य

मी आता प्रोफेशनल होणार आहे.कोणाला भेटायचं, कोणाला नाही याचा आधी विचार करेल, असे म्हणत मारणे यांच्या भेटीवरुन अप्रत्यक्षपणे मत मांडंल. तसेच, पवार साहेबांनी सुद्धा यापुढे विचार करून वागण्याचा सल्ला दिला. ठेच लागल्याशिवाय माणूस शहाणा होत नसल्याचे विधान करत त्यांनी कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीवर भाष्य केलं.

Ahmednagar Lok Sabha Election 2024
Swati Maliwal Assault Case : स्वाती मालीवाल यांनी उचललं मोठं पाऊल; राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांना लिहिलं पत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com