Nitesh Rane on Aamir Khan : आमिर खान 'लव्ह जिहाद'चा ब्रँड ॲम्बेसेडर; चित्रपटांवर बहिष्कार टाका; शिर्डीतून नीतेश राणेंचा हल्लाबोल

BJP minister targets Aamir Khan and criticises Sanjay Raut in Shirdi : शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद; उद्धव ठाकरे गटावरही टीका, राम मंदिर देणगी प्रकरणावर बोलणाऱ्यांनी हज घोटाळ्यावरही भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी.
Nitesh Rane on Aamir Khan
Nitesh Rane on Aamir KhanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Love Jihad controversy : अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या विवाहाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या विविध स्तरांतून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे भाजपचे राज्यातील मंत्री नीतेश राणे यांनी आमिर खानवर निशाणा साधला आहे.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाणाऱ्या, मानवता आणि सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत राणे यांनी अशा प्रकारे टीकेची झोड उठवली.

आमिर खान हा लव जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर असल्याचा आरोप त्यांनी केला. हिंदू (Hindu) समाजातील तरुणांनी त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन नीतेश राणे यांनी केले.

त्याचबरोबर, राम मंदिर (Ram Mandir) देणगी चोरीबद्दल बोलणारे हज घोटाळ्यावर गप्प का? इतर धार्मिक संस्थांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांवर ते का बोलत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षावर हल्लाबोल केला.

Nitesh Rane on Aamir Khan
Hotel Owner Murder : श्रीरामपूर हादरलं! जेवणाची ऑर्डर उशिरा मिळाल्याच्या वादातून हॉटेल मालकाची निर्घृण हत्या

शनिवारी शिर्डी येथे श्री साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी मंत्री नीतेश राणे आणि त्यांची आई नीलमताई सोबत आले होते. भाजपचे पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते. साई दर्शनानंतर मंत्री राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Nitesh Rane on Aamir Khan
Marathi Language Dispute : लोकलमध्ये 'मराठी बोला'वरून वाद; प्रवाशाला RPF कार्यालयात दोन तास बसून ठेवले, रेल्वेकडून चौकशी सुरू

राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांनी जनतेसमोर स्वतःची भूमिका स्पष्ट करावी, असे राणे यांनी म्हटले. खासदार संजय राऊत भाजपमध्ये काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांचा मालक साधा ग्रामपंचायत सरपंच सुद्धा होऊ शकत नाही, ते इतरांना राजकारणाचे धडे देत आहेत, अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर सडकून टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com