Hotel Owner Murder : श्रीरामपूर हादरलं! जेवणाची ऑर्डर उशिरा मिळाल्याच्या वादातून माजी नगरसेवकाच्या मुलाची हॉटेलमध्ये निर्घृण हत्या

Hotel owner killed after food delay dispute; three arrested, CCTV captures attack : मुंबईहून आलेल्या पाहुण्यांच्या ऑर्डरवरून वाद; टी-पॉयने जीवघेणा हल्ला, तिघांना अटक तर दोघे पसार; संपूर्ण थरार CCTVमध्ये कैद
Hotel Owner Murder
Hotel Owner MurderSarkarnama
Published on
Updated on

Shrirampur crime latest news : मुंबईहून हाॅटेलमध्ये मुक्कामी आलेल्या पाहुण्यांना जेवणाची ऑर्डर उशिरा मिळाल्याच्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून माजी नगरसेवकाच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूरमध्ये घडली. आकाश चंद्रशेखर उर्फ शेखर वेंकटरमन दुबय्या (वय 34) असे हत्या झालेल्या हाॅटेल मालकाचे नाव आहे.

श्रीरामपूर शहरातील हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग येथे आज दुपारी ही घटना घडली. या किरकोळ कारणातून घडलेल्या निर्घृण हत्याकांडामुळे श्रीरामपूर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मुख्य आरोपी सूरज जाधव, यश जाधव आणि ओम डफळ (सर्व रा. श्रीरामपूर) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांबरोबर असलेले मुंबईचे दोघे पाहुणे पसार आहेत. श्रीरामपूर पोलिस (Police) त्यांचा शोध घेत आहेत. या मारहाणीत मुख्य आरोपी सूरज जाधव, मयत आकाशचे वडील माजी नगरसेवक शेखर दुबय्या आणि चुलत भाऊ कुणाल कैलास दुबय्या हे दोघे जखमी झाले आहेत.

​पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून आलेले दोघे जण आज मयत आकाश याच्या श्रीरामपूरमधील (Shrirampur) हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग येथे मुक्कामी आले होते. मात्र त्यांची हॉटेलच्या रजिस्टरला अधिकृत नोंद झालेली नव्हती. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. मात्र, ऑर्डर मिळण्यास काहीसा उशिर झाला. यावरून, मुंबईच्या पाहुण्यांबरोबर नशेत असलेल्या स्थानिक आरोपींनी हॉटेल वेटरशी वाद घातला. त्याला मारहाण केली.

Hotel Owner Murder
Durga Tambe Privilege Motion : दुर्गा तांबेंच्या वक्तव्यावरून वाद; आमदार अमोल खताळ यांचे विधानसभेत हक्कभंग कारवाईसाठी निवेदन

हा वाद मिटवण्यासाठी हॉटेल मालक म्हणून आकाश पुढे आला. हल्लेखोरांनी रागात हॉटेलमधील टी-पॉय व इतर जड वस्तूंनी जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने आकाश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. आकाश याला तातडीने श्रीरामपूरमधील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

Hotel Owner Murder
Dnyaneshwari Ghat Naming : 'इमामपूर घाट'चा झाला 'ज्ञानेश्वरी घाट'; माजी मंत्री शंकरराव गडाख यांची नवी 'राजकीय विनिंग'?

हल्लेखोरांपासून वाचवण्यासाठी गेलेला त्याचा चुलत भाऊ कुणाल याच्याही डोक्याला इजा झाली. त्याच वेळी पुण्याच्या प्रवासाहून नुकतेच हॉटेलमध्ये पोहोचलेले आकाशचे वडील शेखर दुबय्या यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी त्यांनाही मारहाण केली. हल्ल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.

सीसीटीव्हीमध्ये कैद झाला थरार

हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सगळा थरार कैद झाला आहे. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे तातडीने शोधमोहीम राबवून यश जाधव आणि ओम डफळ या दोघांना ताब्यात घेतले. यातील यश याला रुग्णालयाच्या बाथरूममध्ये, तर ओम याला सेवा नर्सिंग कॉलेजमधून पोलिसांनी अटक केली. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्या सूरज जाधव या मुख्य आरोपीवर पोलिस बंदोबस्तात साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नर्सिंग स्कूलमध्ये शिक्षण घेणारा आरोपी

​या गुन्ह्यातील आरोपींच्या पार्श्वभूमीबाबत पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी सूरज जाधव याची बसस्थानकाजवळ चिकन टिक्क्याची गाडी आहे. यश जाधव हा त्याच्याच गाडीवर काम करतो. तर नर्सिंग कॉलेजमधून अटक करण्यात आलेला ओम डफळ हा साखर कामगार रुग्णालयाच्या सेवा नर्सिंग स्कूलमध्ये शिक्षण घेत असून, रुग्णालयाच्या पाठीमागेच त्याची भाडोत्री खोलीत राहतो.

मुख्य आरोपीचा नातेवाईक गुन्हेगारी पार्श्वभूमीचा

मुंबईच्या पाहुण्यांसोबत या स्थानिक आरोपींनी एकत्र मद्यप्राशन केले होते. विशेष म्हणजे, मारहाणीच्या मुख्य प्रसंगादरम्यान मुंबईचे ते दोन पाहुणे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. मुख्य संशयित सूरज हा परिसरातील एका मोठ्या गुन्हेगाराचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल

​घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांनी तातडीने घटनास्थळासह साखर कामगार रुग्णालयाला भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून महत्त्वाचे भौतिक व तांत्रिक पुरावे संकलित केले आहेत. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com