

Dhule Crime News: तीन वर्षांपूर्वी गाजलेल्या नोकरीच्या घोटाळ्यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. फरारी संशयित न्यायालयातून जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत.
अलिबाग येथील वैभव विजय पोळ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी खानदेशातील शेकडो युवकांना नोकरीचे आमिष दाखवले. युवकांकडून दिशाभूल करून पैसे उकळले. यातील कोणालाही नोकरी न मिळाल्याने मोठी फसवणूक झाली होती.
याबाबत साखरे पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. २२१ बेरोजगार युवकांकडून दोन कोटी 85 लाख रुपये उकळण्यात आले होते. याशिवाय तक्रार न केलेल्या अनेकांकडूनही पैसे घेतल्याचा संशय होता.
गुन्हा दाखल झाल्यावर संशयित वैभव पोळ प्रसार झाला होता. गेले तीन वर्ष त्याचा शोध सुरू होता. मात्र तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. पोलिसांना हुलकावणी देण्यात तो यशस्वी झाला होता.
संशयित वैभव पोळ धुळे जिल्हा न्यायालयात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत पाटील यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह न्यायालयात पाळत ठेवली. न्यायालयात जामिनासाठी आलेल्या पोळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी प्रसार होण्याचा त्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
धुळे आणि नाशिकसह परिसरातील शेकडो युवकांना नोकरीच्या वेळेस दाखवून वैभव पोळ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जाळ्यात जोडले होते. विशेषता सुशिक्षित बेरोजगार या प्रकरणात फसले गेले. यातील काहींना तक्रार केल्यानंतर पैसे परत देण्याचा प्रयत्न पोळ्यांनी केला. मात्र बहुतांश युवकांची पैसे घेऊन फसवणूक झाली होती. न्यायालयातून वेळ काढून पणा आणि अटकपूर्व जामीन मिळवून पोलिसांना गुंगारा देण्याचा वैभव पोळ याचा प्रयत्न मात्र फसला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.