Nashik Farmers News : नाशिकचे कांदा व्यापारी दाबणार राज्य सरकारचे नाक!

Onion traders of Nashik went on strike against State Government-कांदा निर्यात तसेच शुल्काबाबत व्यापाऱ्यांनीच बंद पुकारल्याने जिल्ह्यातील कांद्याची उलाढाल ठप्प.
Onion
OnionSarkarnama
Published on
Updated on

Nashik Farmers News : कांदा प्रश्नावर विविध शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या संघटना आंदोलन करीत असतात. त्यात नाशिकसाठी काहीही नवे नाही. मात्र, आता खुद्द कांदा व्यापाऱ्यांनीच राज्य व केंद्र सरकारच्या धोरणातील अन्याय उघड करीत बंद पुकारला आहे. (Nashik APMC closed due to onion traders strike in District)

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी कांदा निर्यात शुल्क तसेच वाहतुकीत पन्नास टक्के अनुदान मिळावे, यासाठी (Maharashtra Government) आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. त्यात शेतकऱ्यांची (Farmers) अडचण झाली आहे.

Onion
Maratha Reservation Meeting: मराठा आरक्षणाच्या बैठकीला काँग्रेस, ठाकरे गटाच्या खासदारांची दांडी

आशिया खंडातील कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बुधवारी (ता. २०) लिलाव बंद ठेवल्यामुळे जिल्ह्यात २७ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. कांद्याव्यतिरिक्त लिलाव सुरू राहिल्याने या बंदचा दळणवळणावर फारसा प्रभाव पडलेला दिसून येत नाही.

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख एकूण १६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव होतात. मागील आठवड्यात दरदिवशी सव्वा लाख ते दीड लाख क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक या बाजार समित्यांमध्ये झाली. यात लासलगाव, निफाड, उमराणे, सिन्नर, नाशिक, मनमाड आदी महत्त्वाच्या बाजार समित्यांचा समावेश होतो.

कांद्याला पतवारीनुसार कमीत कमी ५०० ते जास्तीत जास्त २२०० रुपये क्विंटल, असा भाव मिळाला. सरासरी १८०० ते १९०० रुपये भाव मिळत असल्याने जिल्ह्यात २७ कोटींची एका दिवसाची उलाढाल बुधवारी बंद होती. व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी लिलाव बंद ठेवले आहेत.

लासलगाव ही कांद्याची मुख्य बाजारपेठ असल्याने येथील बाजार पूर्ववत करण्यासाठी सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी संचालक मंडळाची बैठक घेऊन काय उपाययोजना करता येतील, यादृष्टीने विचारविनिमय केला. व्यापाऱ्यांच्या मागण्या या राज्य व केंद्रीय स्तरावरील असल्यामुळे त्यांच्या मागणीकडे सरकारने त्वरित लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

Onion
Abdul Sattar News : सत्तार संतापले, बंद पाळणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार!

जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांनी कांद्याचे लिलाव बंद ठेवल्याने एकही ट्रॅक्टर विक्रीसाठी दाखल झाला नाही. भाजीपाल्यासह कडधान्याचे लिलाव नियमितपणे सुरू राहिल्याने दळणवळणावर बंदचा फारसा प्रभाव पडलेला नाही.

Onion
NCP Agitation : आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर भाजपने कारवाई करावी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com