Operation Tudva : 'ऑपरेशन तुडवा'पूर्वीच पोलिसांची कारवाई! खासदार वाकचौरे थोडक्यात बचावले; शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी ताब्यात

Police Detain Shiv Sena UBT Workers Before Protest Against MP Bhausaheb Wakchaure : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार वाकचौरेंविरोधात आंदोलनाची तयारी; गिरीश जाधवांसह शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेताच संतापाला उद्रेक
Bhausaheb Wakchaure Operation Tudva
Bhausaheb Wakchaure Operation TudvaSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray Shiv Sena : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून फुटून, सत्ताधारी महायुतीतील एकनाथ शिंदे शिवसेनेत दाखल झालेले, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे ठाकरेंच्या शिलेदारांच्या 'ऑपरेशन तुडवा'पासून थोडक्यात वाचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्याच्या खाकीनं ठाकरेंच्या शिलेदारांना ऑपरेशन तुडवा होण्यापूर्वीच ताब्यात घेतले.

शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी, कारवाईसाठी आलेल्या पोलिसांना, तुम्ही चोराला संरक्षण देत आहात, ही लोकशाहीची थट्टा आहे, असे थेट सुनावले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदार फुटून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेत सहभागी झाले. यात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा देखील समावेश होता. ठाकरेंनी शिर्डीत निष्ठेची वज्रमूठ ही सभा घेत, वाकचौरेंच्या गद्दारीवर जोरदार तोड डागली होती.

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हा कसला भाऊसाहेब, हा तर खाऊसाहेब! पळालाय सापडला तर सोडू नका, असे फर्मान सोडले होते. उद्धव ठाकरे यांची साथ सोडणाऱ्या सहाही खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यात खासदार वाकचौरेंना देखील ही सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे.

Bhausaheb Wakchaure Operation Tudva
Bhausaheb Wakchaure Shirdi : खासदार वाकचौरेंविरोधात संताप! 'चप्पलांचा हार', ‘गद्दार’, 'लालची कुत्रा' म्हणत रास्ता रोको, तर विखे अन् खताळांचा थेट इशारा

शिवसेना ठाकरे सेना पक्षाने या सहा गद्दार खासदारांविरोधात 'ऑपरेशन तुडवा' जारी केलं आहे. खासदार वाकचौरे यांची राजकीय वाटचाल पाहिल्यास त्यात त्यांनी ऐनवेळी दगा दिल्याचेच अधिक दिसते. ठाकरेंना आतापर्यंत दोन वेळा खासदार वाकचौरेंनी दगा दिला आहे. त्यामुळे शिवसैनिक प्रचंड आक्रमक आहेत.

Bhausaheb Wakchaure Operation Tudva
Om RajeNimbalkar Vs Uddhav Thackeray : ओम राजेनिंबाळकरांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं! फक्त आक्रमक मेथड बदलणार...

ठाकरेंचे पदाधिकारी पोहोचले अन्....

खासदार भाऊसाहेब वाकचौरे आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते. ठाकरेंच्या शिवसैनिकांना याची माहिती मिळताच, शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव आणि युवा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गनिमी कावा करत गाठलं. एक-एक करत पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोहोचले.

काळे फासण्याचा होता प्लॅन?

पोलिसांना याची माहिती मिळताच, पोलिस देखील सावध झाले. खासदार वाकचौरेंविरोधात 'ऑपरेशन तुडवा' होणार याची भनक पोलिसांना लागली. वेळप्रसंगी काळं देखील फासलं जाऊ शकते, हे लक्षात घेत, पोलिसांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांभोवती फिल्डिंग लावली. गिरीश जाधव यांना पोलिसांनी थेट ताब्यात घेतले.

पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिस बळाचा वापर

गिरीश जाधव जिल्हाधिकारी सोडायला तयार नव्हते. त्यांच्याबरोबर असलेले पदाधिकारी देखील आक्रमक झाले. तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्ताजी वैद्य यांनी पुढे येताच, पोलिस ठाण्यातून अतिरीक्त पोलिस बळ, पोलिस व्हॅन बोलावून घेतली. पोलिसांनी बळाचा वापर करत, गिरीश जाधव व त्यांच्याबरोबर असलेल्या पदाधिकाऱ्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसून पोलिस ठाण्यात आणलं.

'ऑपरेशन तुडवा'ची टांगती तलवार

शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेताच, गिरीश जाधव यांनी, पोलिसांना चोरांना संरक्षण देत आहात. लोकशाहीची थट्टा चालवली आहे, अशा शब्दात सुनावले. पोलिसांनी शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याने खासदार वाकचौरेंवरील 'ऑपरेशन तुडवा' राहिल. पण भविष्यात या ऑपरेशनची खासदार वाकचौरेंवर टांगती तलवारच राहिल, अशी चर्चा अहिल्यानगर जिल्ह्यात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com