Kishor Patil : आमदार किशोर पाटील भाजपला पुरुन उरले, पाचोरा-भडगाव दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणले

pachora-bhadgaon-municipal-election : शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपसोबत युती न करता भाजपला आव्हान दिलं होतं. भाजपवाले कधीही पलटी खाऊ शकतात असे सांगून त्यांनी भाजपसोबत युती करायला नकार दिला होता.
Kishor Patil & Girish Mahajan
Kishor Patil & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : शिवसेना शिंदे गटाचे पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी आपला स्वबळाचा नारा यशस्वी करुन दाखवला आहे. भाजपच्या तगड्या आव्हानाला त्यांनी धूळ चारली आहे. त्यांच्या पत्नी सुनीता किशोर पाटील या पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी विजयी झाल्या आहेत. तसेच भडगावमध्येही शिवसेना शिंदे गटाच्या रेखा मालचे यांनी बाजी मारली आहे.

किशोर पाटील यांनी भाजपला आव्हान देत राज्यात सर्वात आधी आपल्या मतदारसंघात स्वबळाची घोषणा केली होती. कोणत्याही परिस्थिती भाजपसोबत युती करणार नाही असा पवित्र त्यांनी घेतला होता. भाजपचे स्थानिक तसेच वरिष्ठ सर्वच नेत्यांनी किशोर पाटलांना त्यानंतर घेरलं होतं. मात्र किशोर पाटील भाजपला पुरुन उरले आहेत.

किशोर पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे पाचोरा व भडगाव दोन्ही नगरपालिकेत शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. आमदार किशोर पाटील यांनी भाजपच्या तगड्या आव्हानाला धूळ चारत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

Kishor Patil & Girish Mahajan
Eknath Shinde Politics: एकनाथ शिंदे भाजपलाही नडले; कुंभमेळा नगरीतच ठरले नंबर वन, महाविकास आघाडीचा सुपडा साफ!

पाचोरा येथे किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी विजय मिळवला आहे, तर भडगावमध्येही शिवसेनेच्या रेखा मालचे विजयी झाल्या आहेत.

भाजपचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांच्यासह मंगेश चव्हाण व इतर भाजपच्या सर्वच स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, या सर्वांना किशोर पाटील यांनी चितपट करत दोन्ही नगरपालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.

Kishor Patil & Girish Mahajan
Muktainagar Election Result : मुक्ताईनगर'ला रक्षा खडसेंना झटका, शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांनी लेकीला निवडून आणलं..

मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे आणि किशोर पाटील यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी या सगळ्यांची फौज एकट्या किशोर पाटलांना पराभूत करण्यासाठी मैदानात उतरली होती. पण किशोर पाटील या सगळ्यांवर भारी पडले.

या विजयानंतर किशोर पाटील यांचे राजकीय वजन वाढले असून पाचोरा आणि भडगावमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला आहे. किशोर पाटील यांच्या नेतृत्त्वात झालेल्या या विजयाने परिसर दणाणून गेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com