गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने १५ वर्षांपासून अंधारातील फुलगावची घरकुले उजळणार!

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना संतोष सोनवणे, निळकंठ चौधरी आदींनी निवेदन दिले.
Minister Gulabrao Patil, Jalgaon
Minister Gulabrao Patil, JalgaonSarkarnama
Published on
Updated on

भुसावळ : फुलगाव (ता. भुसावळ) येथील वाढीव हद्दीतील वस्तीमध्ये शासनाच्या घरकूल योजनेतून गरिबांना हक्काचा निवारा मिळाला. मात्र गेल्या १५ ते २० वर्षापासून वीज न मिळाल्याने ते अंधारात होते. याची माहिती मिळाल्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यात लक्ष घातले. तातडीने वीजपुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे आता या वस्तीतील अंधकार दूर होणार आहे.

Minister Gulabrao Patil, Jalgaon
भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन नाथाभाऊ खडसेंपुढे कच्चा लिंबू ठरले?

फुलगाव (ता. भुसावळ) येथील वाढीव वस्तीत पथदिवे (स्ट्रीट लाईट) चा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे या वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना शासनाने दिलेल्या घरकुलामध्ये विद्युत पुरवठा घेता येत नव्हता. अंधारामुळे होणाऱ्या अनेक त्रासांना वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सामोरे जावे लागत होते. हा प्रश्न फुलगावचे निळकंठ एकनाथ चौधरी यांनी पुढाकार घेऊन वाढीव वस्तीमधील ३३ स्ट्रीट लाईट पोलचा प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून तयार करून घेतला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तो सादर केला.

Minister Gulabrao Patil, Jalgaon
महापौरांच्या `भैय्या`च्या आशीर्वादाने भाजपचे दोन नगरसेवक कचऱ्याचा ठेका चालवितात`

या वस्तीत १५ ते २० वर्षांपासून वीज पुरवठा नाही, ही माहिती मिळाल्यावर पालकमंत्र्यांना देखील आश्चर्य वाटले. त्यांनी त्याबाबत तातडीने संबंधीतांशी संपर्क करून माहिती घेतली. त्यानंतर तातडीने पथदीपांची कार्यवाही करून वस्तीला वीज पुरवठा सुरु करण्याच्या सूचना केल्या. पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याने येथील अंधकार आता दुर होणार आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फुलगाव येथील वीज पुरवठा मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांना आदेश केले. यामुळे फुलगाव येथील वाढीव वस्तीमधील रहिवाशांच्या घर व परिसर प्रकाशमय होईल अबाल वृद्धांनाचे होणारे हाल त्रास थांबतील. याबाबत ग्रामस्थांमध्ये समाधान वाटते.

- संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख, शिवसेना.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com