Chhagan Bhujbal : 'त्या' 62 एकर जागेचे करायचे काय? मंत्री छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

Chhagan Bhujbal Demand : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्ह्याची वार्षिक आढावा बैठक पार पडली. त्यात अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी मागणी केली.
Devendra fadnavis, chhagan bhujbal
Devendra fadnavis, chhagan bhujbal .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिकमधील पोलिस अकादमीसमोरील ६२ एकर जागा शासनजमा करण्याचे चांगले काम महसूल विभागाने केले असून या जागेवर मध्यवर्ती प्रशासकीय संकुल उभारून सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्याची मागणी राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी काल झालेल्या राज्य नियोजन आराखडा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली (बुधवार दि. ११) रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्याचे अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी हा मुद्दा उपस्थित करत या कारवाईबद्दल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. त्र्यंबक रोडवरील पोलिस प्रशिक्षण केंद्रासमोरील पीटीसी समोरील जागेचे सर्व व्यवहार बेकायदेशीर ठरवत ही जमीन शासनजमा करण्याची महसूल विभागाने नुकतीच कारवाई केली.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महसूल प्रशासनाने नाशिकमध्ये केलेली ही अत्यंत मोठी कारवाई आहे. आता या जागेवर मध्यवर्ती प्रशासकीय संकुल उभारले जावे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी भुजबळ यांच्या मागणीवर तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले. त्यामुळे आता या जागेवर मध्यवर्ती प्रशासकीय संकुल उभारण्यासंदर्भात हालचाली गतीमान झाल्या आहेत.

Devendra fadnavis, chhagan bhujbal
Nashik NMC : महापौर- उपमहापौर झाले, आता नाशिक भाजपमध्ये सभागृहनेते पदासाठी रस्सीखेच, ही चार नावे आघाडीवर

जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधी वाढवून मिळावा

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०२५-२६ साठी ९०० कोटी रुपयांची तरतूद होती. सन २०२६ - २७ साठी ही ६९१.९० कोटी रुपये मर्यादा शासनाने कळवली आहे. म्हणजे पुढील वर्षासाठी २०९ कोटी नियतव्यय कमी करण्यात येणार आहे. मात्र आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचा निधी कमी करू नये, शासकीय यंत्रणांकडून अधिक ६४२ कोटी इतकी वाढीव निधीची मागणी आहे. त्यानुसार ६९१.९० अधिक ६४२ अशी एकूण १३३३.९० कोटी इतकी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी भुजबळांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

जिल्ह्याचा वेगाने होत असलेला विकास, नाशिक जिल्ह्यातून मिळणारा सर्वाधिक महसूल,वाढती लोकसंख्या आणि विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या वाढीव मागण्या लक्षात घेता निधी कमी करू नये असे भुजबळांनी बैठकीत सांगितले.

Devendra fadnavis, chhagan bhujbal
Devendra Fadnavis Nashik : भाजपला स्पष्ट बहुमत दिलं, आता नाशिकच्या विकासासाठी फडणवीसांचा मोठा शब्द

नाशिक जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी नाशिक कलाग्राम आणि गंगापूर धरण येथील सी प्लेन बाबत लवकर कार्यवाही करण्याची त्यांनी मागणी केली. तसेच सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मंजूर निधीचा आढावा घेताना त्यांनी प्रशासनाला निधी खर्चाच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना दिल्या. सर्व योजनांच्या सर्व प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात याव्या तसेच मार्च अखेर पर्यंत १०० टक्के निधी खर्च होईल याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश मंत्री भुजबळांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com